पेपर फुटला नाही, तर परीक्षा का रद्द केली?

नवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी होणारी देशातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा नीट यूजी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ३ मे रोजी परीक्षा पार पडली, पण या परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच फुटली होती, अशी माहिती समोर आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. या प्रकरणी संसदीय समितीने एनटीएचे संचालक (नीट परीक्षा घेणारी संस्था) अभिषेक सिंह आणि चेअरमन प्रदीप कुमार जोशी यांची चौकशी केली. यावेळी एनटीएच्या संचालकांनी प्रश्नपत्रिका फुटली नाही, तर त्यातील काही प्रश्न बाहेर आले असे उत्तर दिल्यानंतर समिती संतापली.

संसदीय समितीच्या बैठकीत राधाकृष्णन समितीच्या शिफारशी आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांवर चर्चा करण्यात आली. जेव्हा समितीतील खासदारांनी नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली कशी, असा प्रश्न विचारला तेव्हा एनटीएचे संचालक म्हणाले की, आमच्याकडून कोणताही पेपर फुटला नाही आणि याचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. एनटीएच्या संचालकांनी दिलेल्या उत्तरानंतर समितीतील अनेक खासदार भडकले. ते म्हणाले की, जर एनटीएच्या यंत्रणेकडून पेपर लीक झाला नाहीये, तर मग सीबीआय तपास कशाचा करत आहे? या प्रश्नावर एनटीएचे संचालक शांत बसले.

एनटीएचा स्वत:ला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न
एनटीएकडून स्वत:ला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, सरकारने याआधीच कबुली दिली आहे की, नीटचा पेपर फुटला आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. नीट पेपर कुणाकडून आणि कशा पद्धतीने लीक करण्यात आला. तो किती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला, याचा तपास सीबीआय करत आहे.

नीटची परीक्षा पुन्हा का घेतली जात आहे?
संसदीय समितीतील सदस्यांनी एनटीएलाच चौकशीच्या फे-यात घेतले. एनटीए या प्रकरणात दोषी नाहीये, तर मग परीक्षा रद्द का झाली आहे? असा प्रश्न समितीकडून विचारण्यात आला. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका दहा दिवस आधीच फुटली होती. या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची पीडीएफ अनेकांना पुरवण्यात आली. या प्रकरणात लातूरमधील प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यालाही अटक करण्यात आली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्रातील अनेक जणांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली असून काही जणांना अटकही करण्यात आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर - मिनी मार्केट जवळील पेट्रोल पंपावर स्कूटीने घेतला अचानक पेट #marathilivenews #maharashtranews
00:42
Video thumbnail
Latur|चोला फायनान्सचा मॅनेजर लाखो रुपये घेऊन फरार?
06:08
Video thumbnail
Latur|मोदी सरकारचा मोठा निर्णय? उज्ज्वला महिलांना बसला धक्का!
04:49
Video thumbnail
Nanded|महायुतीत मतभेद नाहीत;हेमंत पाटील यांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
01:21
Video thumbnail
Latur|रुग्णालयाच्या जागेवर बुलडोजर;अतिक्रमण हटवताना आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवला जीव!
02:49
Video thumbnail
Latur|मुरुड शहर कचराकोंडीत; ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार
02:22
Video thumbnail
Latur|गॅस टंचाईमुळे पुन्हा पेटल्या चुली; लाकडाला आले सोन्याचे दिवस
04:34
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23

Latest news