वर्षाच्या अखेरीस जगाच्या नकाशावर दिसू शकतो ‘अल्बर्टा’ नवीन देश

टोरंटो : जागतिक राजकारणातून या घडीची एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे. खलिस्तानवाद्यांना पाठिंबा देऊन भारताशी पंगा घेणा-या कॅनडाला आता स्वत:चा देश वाचवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कॅनडाचा अत्यंत महत्त्वाचा आणि श्रीमंत भाग असलेला अल्बर्टा प्रांत कॅनडापासून वेगळा होण्याची मागणी तीव्र झाली आहे. या वाढत्या बंडखोरीमुळे अखेर कॅनडा सरकारला गुडघे तकावे लागले असून, येथे आगामी १९ ऑक्टोबर रोजी जनमत संग्रह घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या जनमत संग्रहात जर अल्बर्टाच्या जनतेने कॅनडापासून वेगळे होण्याच्या बाजूने मतदान केले, तर या वर्षाच्या अखेरीस जगाच्या नकाशावर अल्बर्टा नावाचा एक नवीन सार्वभौम देश उदयास येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, वादग्रस्त पॅलेस्टाईन देशाला मान्यता मिळण्यापूर्वीच अल्बर्टा जगाच्या पाठीवर नवीन देश म्हणून समोर येईल.

३ लाख लोकांची स्वाक्षरी
अल्बर्टा प्रांतातील बंडखोर नेत्या डेनियल स्मिथ यांनी या जनमत संग्रहाची अधिकृत घोषणा केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच अल्बर्टामधील तब्बल ३ लाख लोकांनी कॅनडा सरकारपासून वेगळे होण्यासाठी जनमत संग्रह घेण्यात यावा, अशी लेखी याचिका दाखल केली होती. लोकभावना आणि वाढता असंतोष पाहता, ओटावा येथील सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या ‘इप्सोस’च्या एका सर्वेक्षणात २८ टक्के लोकांनी उघडपणे अल्बर्टाला कॅनडापासून वेगळे करण्याची मागणी केली होती.

कॅनडाचे इंजिन रोखणार?
अल्बर्टा हा कॅनडाच्या पश्चिमेकडील अत्यंत महत्त्वाचा प्रांत आहे. कॅनडातील सर्वात जास्त कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा साठा याच प्रांतात आहे. ‘ऑईल डॅशबोर्ड’च्या आकडेवारीनुसार, अल्बर्टामध्ये तब्बल १.६५ लाख अब्ज बॅरल तेल साठा जमा आहे. २०१८ मध्ये पहिल्यांदा अल्बर्टाला कॅनडापासून वेगळे करण्याची मागणी झाली होती. सुरुवातीला ही लढाई केवळ आर्थिक अन्यायाविरुद्ध होती. अल्बर्टाच्या लोकांचे म्हणणे होते की, त्यांच्या तेलातून मिळणारा महसूल कॅनडाच्या इतर भागांवर खर्च केला जातो, तर अल्बर्टाच्या आर्थिक गरजांकडे दुर्लक्ष केले जाते. ओटावामधील सरकार आमचा आवाज ऐकत नाही, असा आरोप बंडखोरांचा आहे.

ट्रम्प यांचा कॅनडावर दबाव?
या संपूर्ण प्रकरणामागे अमेरिकेचा हात असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा कॅनडा आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक मतभेद तीव्र झाले, तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिर्का­यांनी अल्बर्टाच्या फुटीरतावादी नेत्यांशी थेट व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली होती. अमेरिकेने कॅनडाचे पंतप्रधान आणि सरकारवर दबाव वाढवण्यासाठीच हा डाव खेळल्याचे मानले जात आहे. अल्बर्टा युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर बोइली यांच्या मते, सुरुवातीला हा केवळ आर्थिक विचार होता, पण आता त्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप आले आहे.

नवीन देश बनण्याची प्रक्रिया काय असेल?
जर १९ ऑक्टोबरच्या जनमत संग्रहात होय या पर्यायाला बहुमत मिळाले, तर नवीन देश बनवण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल. आधी कॅनडा आणि अल्बर्टा यांच्यात आंतरराष्ट्रीय सीमा निश्चित केली जाईल. अल्बर्टा स्वत:चे नवीन संविधान, स्वत:चा राष्ट्रीय खजिना आणि कायदे व्यवस्था तयार करेल. यानंतर जागतिक मान्यतेसाठी संयुक्त राष्ट्रात सदस्यत्वासाठी अर्ज केला जाईल.

पंतप्रधानांसमोर मोठे आव्हान
कॅनडा सरकार हा जनमत संग्रह अयशस्वी करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावत आहे. विशेष म्हणजे, कॅनडाचे सध्याचे पंतप्रधान मार्क कार्नी हे स्वत: अल्बर्टा प्रांतातूनच येतात, त्यामुळे आपल्याच घरच्या मैदानात देशाचे विभाजन रोखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|लातुरातील दयानंद महाविद्यालयाच्या परिसरातील नामांकित डॉक्टरची CBI कडून चौकशी सुरू
02:22
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|लातूरमधील औसा रोड परिसरातील नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर?
01:52
Video thumbnail
Latur|खंडापूर पादुका दर्शन अपहार प्रकरण; किशोर महाराजांच्या प्रतिमेला जोड्याचा हार, धरणे आंदोलन सुरु
04:10
Video thumbnail
शिव ठाकरेच्या अमरावतीतील घरी फराह खान यांची सरप्राईज भेट; शिवच्या आजीच्या हातच्या भाकरीवर मारला ताव
00:31
Video thumbnail
लातूरमध्ये खुराणा ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप!
00:35
Video thumbnail
लातूर पॅटर्नचे यश, आव्हाने आणि भविष्य; पहा काय म्हणाले डॉ.सोमनाथ रोडे!
24:00
Video thumbnail
हिंगोलीत डिझेल टंचाईचे संकट! शेतीच्या कामासाठी पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या किलोमीटर लांब रांगा
03:11
Video thumbnail
NEET पेपर फुटी प्रकरण: डॉ. मनोज शिरुरेंच्या पत्नीची CBI कडून कसून चौकशी; धक्कादायक माहिती समोर
03:11
Video thumbnail
उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
09:33
Video thumbnail
लातुरात डॉ. मनोज शिरुरेंच्या नातेवाईकांवर CBI चा छापा; दोन तास चौकशी, मोठी रोकड जप्त!
03:00
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16

Latest news