डिझेलसाठी शेतक-यांचा पेट्रोल पंपावर मुक्काम

मुंजा कंठाळे
बोरी : येथील एचपी पेट्रोल पंपावर डिझेलसाठी ट्रॅक्टरसह कॅन घेऊन शेतक-यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दि.१९ रोजी रात्रीपासून डिझेल संपले असून शेतक-यांनी पेट्रोल पंपवरच मुक्काम ठोकला होता. दोन दिवसानंतर शुक्रवार, दि.२२ रोजी सकाळ पासून डिझेल पुरवठा सुरळीत झाला आहे. डिझेल पुरवठा सुरळीत झाला असला तरी शेतक-यांकडून होत असलेली डिझेलची मागणी पाहता हा साठा पुरा पडेल का अशी शंका निर्माण होत आहे. डिझेल वेळेवर मिळत नसल्याने शेत मशागतीची कामे खोळंबली असून शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरणा निर्माण झाले आहे.

प्रशासनाकडून शेत मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरला १०० लिटर पर्यंत डिझेल देण्याच्या सुचना पेट्रोल पंप चालकांना देण्यात आल्या आहेत. शेजारच्या हिंगोली जिल्ह्यात डिझेल तुटवडा निर्माण झाला असल्याने त्या ठिकाणचे शेतकरी डिझेलसाठी परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी गर्दी करीत आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अनेक ठिकाणी नो स्टॉकचे बोर्ड लागले आहेत. त्यामुळे मान्सुनपूर्व शेत मशागतीची कामे खोळंबतात की काय अशी भिती व्यक्त होत आहे.

बोरी येथील एचपी पेट्रोल पंपवर दि.१९ मे रोजी रात्री ८ वाजल्यापासून डिझेल संपले होते. त्यामुळे शेतक-यांनी पंपावरच मुक्काम ठोकला होता. शुक्रवारी सकाळी १० वाजता डिझेल पंप सुरू झाले असून पंपांवर ट्रॅक्टरसह वाहनाच्या व कॅन घेऊन लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

नियोजनाअभावी शेतकरी हैराण
सध्या मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरने मशागतीची कामे केली जात आहेत. या पार्श्वभुमीवर प्रशासनाने पेट्रोल पंप चालकांना ट्रॅक्टरसाठी १०० लिटर पर्यंत डिझेल देण्याचे आदेशही काढले आहेत. परंतू पुरवठा विभागाने कुठल्याही प्रकारचे नियोजन न केल्यामुळे डिझेल तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी डिझेलसाठी हैराण झाले आहेत. पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|लातुरातील दयानंद महाविद्यालयाच्या परिसरातील नामांकित डॉक्टरची CBI कडून चौकशी सुरू
02:22
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|लातूरमधील औसा रोड परिसरातील नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर?
01:52
Video thumbnail
Latur|खंडापूर पादुका दर्शन अपहार प्रकरण; किशोर महाराजांच्या प्रतिमेला जोड्याचा हार, धरणे आंदोलन सुरु
04:10
Video thumbnail
शिव ठाकरेच्या अमरावतीतील घरी फराह खान यांची सरप्राईज भेट; शिवच्या आजीच्या हातच्या भाकरीवर मारला ताव
00:31
Video thumbnail
लातूरमध्ये खुराणा ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप!
00:35
Video thumbnail
लातूर पॅटर्नचे यश, आव्हाने आणि भविष्य; पहा काय म्हणाले डॉ.सोमनाथ रोडे!
24:00
Video thumbnail
हिंगोलीत डिझेल टंचाईचे संकट! शेतीच्या कामासाठी पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या किलोमीटर लांब रांगा
03:11
Video thumbnail
NEET पेपर फुटी प्रकरण: डॉ. मनोज शिरुरेंच्या पत्नीची CBI कडून कसून चौकशी; धक्कादायक माहिती समोर
03:11
Video thumbnail
उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
09:33
Video thumbnail
लातुरात डॉ. मनोज शिरुरेंच्या नातेवाईकांवर CBI चा छापा; दोन तास चौकशी, मोठी रोकड जप्त!
03:00
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16

Latest news