अमेरिकेकडून एच-१बी व्हिसा घोटाळ्याची चौकशी सुरू

न्यूयॉर्क : अमेरिकेत नोकरी करणा-या भारतीय लोकांच्या नोक-या संकटात आल्या आहेत. अमेरिकेने विविध कंपन्यांकडून एच-१बी आणि पीईआरएम वर्क व्हिसामध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी मोठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या तपासादरम्यान भारतातील आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी कॉग्निझंट देखील चौकशीच्या कक्षेत आली असल्याचे अमेरिकेच्या एका केंद्रीय कामगार अधिका-याने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे भविष्यात कंपन्यांसाठी व्हिसा नियमांचे पालन अधिक कडक होणार असून व्हिसा मंजुरीच्या प्रक्रियेत मोठा वेळ लागण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या कामगार विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ऑफिस ऑफ द इन्स्पेक्टर जनरलने या मोठ्या व्हिसा घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कंपन्या आणि कामगार दलालांनी संगनमत करून बनावट अर्ज सादर केले होते. या प्रक्रियेत परदेशी कामगारांचे शोषण करून त्यांच्या वेतनात फेरफार करण्यात आले, तसेच अमेरिकन बाजारपेठेत कमी वेतनावर कामगार आणून स्थानिक अमेरिकन नागरिकांच्या रोजगारावर गदा आणली गेली, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कामगार विभागाचे इन्स्पेक्टर जनरल अँथनी डी एस्पोसिटो यांनी सांगितले की, या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत डझनभर समन्स जारी करण्यात आले असून प्रत्येक सुगाव्याचा कसून तपास केला जात आहे. कॉग्निझंटसारख्या बड्या कंपन्यांमध्ये पीईआरएम आणि एच-१बी व्हिसा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची माहिती काही व्हिसलब्लोअर्सनी प्रशासनाला दिली असून त्यानुसार कारवाई पुढे नेली जात आहे.

कारस्थानाचा नायनाट करणार
विशेष म्हणजे, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हॅन्स यांच्या नेतृत्वाखालील टास्क फॉर टू एलिमिनेट फ्रॉड या विशेष समितीच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई केली जात आहे. कामगार विभागाच्या वतीने सांगण्यात आले की, व्हिसा कार्यक्रम हा केवळ कामगारांची खरी टंचाई भरून काढण्यासाठी बनवला गेला आहे, मात्र काही घटकांकडून अमेरिकन नोक-यांच्या बदल्यात स्वत:चे खिसे भरण्यासाठी याचा गैरवापर केला जात असून अशा गैरप्रकारांमुळे या संपूर्ण प्रणालीच्या विश्वासार्हतेला तडा जातो. असुरक्षित कामगारांचे आर्थिक शोषण करणा-या आणि अमेरिकन नागरिकांच्या हक्काच्या नोक-या हिरावून घेणा-या प्रत्येक कारस्थानाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी ओआयजी सातत्याने प्रयत्नशील राहील, असा स्पष्ट इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NANDED|नांदेडमध्ये पाकिस्तान कनेक्शन? FDA-पोलिसांची मोठी कारवाई
01:53
Video thumbnail
Nanded|पत्नी नांदायला येत नसल्याने युवक थेट हाय व्होल्टेज टॉवरवर चढला
01:24
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेत नेमकं चाललंय तरी काय?" आशाताई भिसेंचा सवाल
05:02
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
00:00
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
35:17
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
37:07
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये नव्या पुलाचा भाग अचानक कोसळला; मोठी दुर्घटना टळली!
03:36
Video thumbnail
Latur|लातुरात भूकंपाचे धक्के; प्रशासन अलर्ट मोडवर!
02:55
Video thumbnail
Latur| अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण; MIDC पोलिसांच्या केले स्वाधीन!
01:30
Video thumbnail
Latur Earthquake Tremors|मराठवाडा पुन्हा हादरला! मध्यरात्री सलग ४ भूकंपाचे धक्के
01:36
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
46:16
Video thumbnail
Latur|लातूर मनपाच्या स्थायी समिती बैठकीत फाईल गहाळ प्रकरणावर मोठा गदारोळ!
02:27
Video thumbnail
Latur|वासनगाव–गंगापूर रस्त्याची अखेर तातडीने दुरुस्ती सुरू!
01:50
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
09:33
Video thumbnail
Solapur|अक्कलकोटमध्ये पावसाची दडी; खरीप पेरण्या पूर्णपणे रखडल्या!
01:56

Latest news