अनधिकृत पाणी चोरी करणा-या भाजपा नगरसेविकेविरोधात कार्यवाही करा

लातूर : प्रतिनिधी
शहराची पाणी टंचाई सर्वज्ञात असून सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकने नित्याचे झाले आहे. एकीकडे सर्वसामान्य लातूरकर पाणी टंचाईला तोंड देत असताना नगरसेवकांच्या घरात २ अनाधिकृत नळ आढळून आलेले आहेत. याप्रक्रणी मनपाने पंचनामाही केलेला असुन नगरसेविकेला नोटीस बजावण्यात आलेली आहे. मात्र केवळ नोटीस न बजावता त्या नगरसेविकेच्या विरोधात कार्यवाही करुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी प्रभाग १६ मधील नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून मनपा आयुक्त मानसी मीना यांना दिले आहे.
मनपा लोकप्रतिनिधीच्याच घरात पाणी पुरवठा करणा-या ३ नळ जोडण्या आढळून आलेल्या आहेत. यापैकी २ नळ जोडण्या अनाधिकृत असल्याची तक्रार यापूर्वी प्रभाग १६ च्या नागरिकांनी दिलेली होती. तक्रारदारांनी दिलेल्या तक्रानीनुसार मनपा प्रशासनाने प्रभाग १६ च्या भाजपाच्या नगरसेविका राजेश्री धोत्रे व त्यांची पती अंकीत बाहेती यांच्या घरी जावून मनपा प्रशासनाने याबाबत पंचनामा केला. या पंचनाम्यात ३ पैकी १ नळ रुक्मिणी तुकाराम धोत्रे यांच्या नावे असून इतर २ नळ अनाधिकृत असल्याचे किंवा याबाबत मनपा दप्तरी कोणतीच नोंद आढळून आली नाही.
याप्रकरणी मनपा प्रशासनाने भाजपा नगरसेविका राजश्री धोत्रे (बाहेती) व अंकित बाहेती यांना नोटीस बजावून अनाधिकृत नळ जोडण्या अधिकृत करुन घ्याव्यात, अशी नोटीस बजावली आहे. मात्र प्रभाग 16 मधील नागरिकांनी नगरसेविका राजेश्री धोत्रे (बाहेती) व अंकित बाहेती यांच्या विरोधात गुन्हा नोंद करुन दोन्ही अनाधिकृत नळ सील करण्यात यावेत तसेच त्यांच्याकडून अनाधिकृत पाणी वापराची थकबाकी व व्याजासह दंड वसुल करावा अशी मागणी मनपा आयुक्त मानसी मीना यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी कार्यवाही न झाल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा ही दिलेला  आहे. या निवेदनावर मनोज अभंगे, संजय आयाचित, प्रशांत गवंडगावे, विनोद वाकडे, शिवशंकर कावळे, सुभाष वर्मा, विनोद माटेफळकर, गुंडेराव डेंगळे, शिवप्रसाद मालू, पंडीत येलाले, चंद्रकांत सुर्यवंशी आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
डिझेल टंचाईमुळे जिंतूर तालुक्यात शेतकरी हैराण; बोरी येथील पेट्रोल पंपावर मुक्काम ठोकण्याची वेळ
02:45
Video thumbnail
बिलोली उपजिल्हा रुग्णालयात संतापजनक प्रकार! गॅस संपल्याच्या बहाण्याने किचन बंद; रुग्ण उपाशी ?
04:25
Video thumbnail
राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा वाघ हल्ला; सिंदेवाही जंगलात ४ महिलांचा जागीच मृत्यू
00:30
Video thumbnail
५ जूननंतर नांदेड शहरात रस्त्यांची कामे होणार नाहीत; मान्सूनपूर्व बैठकीत मनपा आयुक्त यांचे संकेत
02:33
Video thumbnail
मध्यरात्री काळजाचा ठोका चुकला! माहूरच्या बाबा सोनापीर दर्गा परिसरात बिबट्याचे दर्शन
01:48
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|लातुरातील दयानंद महाविद्यालयाच्या परिसरातील नामांकित डॉक्टरची CBI कडून चौकशी सुरू
02:22
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|लातूरमधील औसा रोड परिसरातील नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर?
01:52
Video thumbnail
Latur|खंडापूर पादुका दर्शन अपहार प्रकरण; किशोर महाराजांच्या प्रतिमेला जोड्याचा हार, धरणे आंदोलन सुरु
04:10
Video thumbnail
शिव ठाकरेच्या अमरावतीतील घरी फराह खान यांची सरप्राईज भेट; शिवच्या आजीच्या हातच्या भाकरीवर मारला ताव
00:31
Video thumbnail
लातूरमध्ये खुराणा ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप!
00:35
Video thumbnail
लातूर पॅटर्नचे यश, आव्हाने आणि भविष्य; पहा काय म्हणाले डॉ.सोमनाथ रोडे!
24:00
Video thumbnail
हिंगोलीत डिझेल टंचाईचे संकट! शेतीच्या कामासाठी पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या किलोमीटर लांब रांगा
03:11
Video thumbnail
NEET पेपर फुटी प्रकरण: डॉ. मनोज शिरुरेंच्या पत्नीची CBI कडून कसून चौकशी; धक्कादायक माहिती समोर
03:11
Video thumbnail
उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
09:33
Video thumbnail
लातुरात डॉ. मनोज शिरुरेंच्या नातेवाईकांवर CBI चा छापा; दोन तास चौकशी, मोठी रोकड जप्त!
03:00

Latest news