काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह

लातूर : प्रतिनिधी
अयोध्येतील श्रीराम मंदिर देणगीतील कथित अपहार व भ्रष्टाचार प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार लातूर शहर जिल्हा काँग्रेस आणि लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज दि. ७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता शहरातील गंज गोलाई येथे ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह करण्यात येणार आहे.
राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावाने देशभरातील भाविकांकडून गोळा करण्यात आलेल्या देणग्यांमध्ये झालेल्या अपहाराच्या विरोधात राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकाराचा निषेध करण्यासाठी लातूरमध्ये काँग्रेस पक्षाकडून अभिनव मार्गाने आंदोलन केले जाणार आहे. या सत्याग्रहाची सुरुवात लातूरचे ग्रामदैवत असलेल्या गंजगोलाई परिसरातील आई जगदंबेच्या चरणी महाआरती अर्पण करून होईल. त्यानंतर भजन व ‘रघुपती राघव राजाराम’ या रामधूनने सत्याग्रह करत संबंधित अपहार प्रकरणाचा जाहीर निषेध केला जाईल.
भाविकांच्या श्रद्धेशी खेळणा-या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहात लातूर शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे व सेलचे प्रमुख, कार्यकर्ते तसेच लातूरच्या सर्वसामान्य नागरिकांनी सकाळी  १०.३० वाजता गंज गोलाई येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके व लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळेकर यांनी या संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|MH-CET पेपरही फुटला? 99 पर्सेंटाइलवरून काँग्रेसचा मोठा आरोप!
02:16
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये चोरट्यांचा धडाका! एका रात्रीत सलग चार दुकाने फोडली
01:52
Video thumbnail
८ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व तपासणी शिबिर
13:50
Video thumbnail
Solapur|उजनी धरण 100 टक्के भरले; भीमा नदीत विसर्ग सुरू
00:23
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप!
08:31
Video thumbnail
Latur|१ ऑगस्टपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा; मातंग समाजाचा इशारा
05:28
Video thumbnail
Latur|किड्स इन्फो पार्कजवळ एसटी आणि स्कूल बसचा अपघात; काही जण किरकोळ जखमी!
00:40
Video thumbnail
Latur|वाहतूक कोंडीला ब्रेक लावण्यासाठी लातुरात मोठा ड्राइव्ह; अतिक्रमणावर कारवाई सुरू!
02:58
Video thumbnail
Nanded|डिजिटल अरेस्टच्या नावाने सायबर ठगांचा नवा डाव; नांदेडमध्ये ५१ लाखांची फसवणूक
03:31
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या मुद्द्यावर नगरसेवकही रस्त्यावर; महामोर्चात सक्रिय सहभाग!
03:13
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणासाठी लातूरमध्ये हजारोंचा एल्गार; महामोर्चाला मोठा प्रतिसाद!
03:32
Video thumbnail
CJP Protest|विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट? शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा
12:07
Video thumbnail
Latur|लातुरात गोर बंजारा कवींचा जल्लोष; मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन!
00:43
Video thumbnail
Latur|मराठवाड्याच्या वीर सुपुत्राला मानवंदना; पानगावात कारगिल शहीद बालाजी माले यांचे स्मरण!
01:11
Video thumbnail
Latur|विठुरायाच्या भक्तांसाठी मनसेची सेवा; अन्नछत्रासह मोफत आरोग्य तपासणी!
02:53

Latest news