तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकासह दोन अधीक्षकांवर गुन्हे दाखल

गडचिरोली : प्रतिनिधी
धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह दोन अधीक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार व अधीक्षक भास्कर भोयर अशी गुन्हे दाखल झालेल्या कर्मचा-यांची नावे आहेत.

सोमवारी मध्यरात्री जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे दीपिका लकडा(१२), सुष्मिता मंडल(१४) आणि अनू कोरेटी(८) या तीन मुलींचा मृत्यू झाला, तर दीपिका मडावी(११), कविता किरंगे(१२) आणि समृद्धी नैताम(१४) या तीन विद्यार्थिनी आजारी पडल्या. यापैकी दीपिका मडावी हिच्यावर नागुपरात उपचार सुरु आहेत.

या घटनेनंतर सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, आदिवासी विकास विभागाच्या उपायुक्त आयुषी सिंह, जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी आश्रमशाळेला भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. शिवाय तत्काळ चौकशी समिती नेमण्यात आली. समितीच्या चौकशीत मुख्याध्यापक, मुलींच्या अधीक्षिका व मुलांचे अधीक्षक दोषी आढळल्याने सहायक प्रकल्प अधिकारी प्रभू सादमवार यांनी धानोरा पोलिस ठाण्यात तक्रार केली.

त्यानुसार, पोलिसांनी प्रशांत ताटपल्लीवार, भाग्यश्री चिलमवार व भास्कर भोयर यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब),३(५) तसेच बाल न्याय(दुरुस्ती)अधिनियम २०१५ च्या कलम ७५ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार यांना संस्थेने घटनेच्या दिवशीच निलंबित केले आहे.

शाळा मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरु
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुदानित आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या उपायुक्त आयुषी सिंह यांनी दिली. तेथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या सोडे आणि मुरुमगाव येथील आश्रमशाळांमध्ये करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40

Latest news