देशात एआयमुळे ७० टक्के रोजगारांचे स्वरूप बदलणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाकित
नागपूर : प्रतिनिधी
रामदेवबाबा विद्यापीठ येथे आज एआय लॅबचे उद्घाटन होत आहे, याचा मला फार आनंद आहे. बनवारीलाल पुरोहित यांनी रामदेवबाबा विद्यापीठाची स्थापना केली. त्यासोबत विदर्भ आणि देशात अग्रणी संस्था म्हणून त्यांनी कार्य केले. खाजगी संस्था असतानाही देशातील चांगली संस्था म्हणून रामदेव बाबा विद्यापीठाकडे पाहिले जाते. येथे केवळ शिक्षण नाही तर संशोधनाला बळ दिलं, त्यामुळे हे विद्यापीठ लवकरच देशातील महत्त्वाच्या विद्यापीठात समाविष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केले. तज्ज्ञांच्या मते किमान ७० टक्के रोजगाराचे स्वरूप येणा-या दिवसात एआयमुळे बदलेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नागपूरच्या रामदेव बाबा अभिमत विद्यापीठात विकसित करण्यात आलेल्या अद्ययावत एआय लॅब तसेच सुपर कम्प्युटरच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. एआय हे भविष्य आहे. आमच्या शिक्षणसंस्थांनी संशोधन करण्याची हीच योग्य वेळ आहे. रोबोटिक्स, बायो टेक्नॉलॉजी आणि इतर सर्व क्षेत्रात तंत्रज्ञानांमुळे बदल होत आहे. तसेच एआय तीव्रतेने सर्व काही बदलत आहे. एआय क्षेत्रातील एका अत्यंत मोठ्या तज्ज्ञ व्यक्तीने मला सांगितले की, येणा-या काळात रोजगाराचे स्वरूप बदलेल. किमान ७० टक्के रोजगाराचे स्वरूप येणा-या दिवसांत एआयमुळे बदलेल. रोजगार जाणार नाही. मात्र, त्याचे स्वरूप बदलेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एआयद्वारे शेतक-यांना
अचूक सल्ला मिळतो
महाराष्ट्रात सरकारने महाविस्तार नावाचे एआय पॉवर्ड अ‍ॅप विकसित केले. त्याद्वारे महाराष्ट्राचे शेतकरी त्यांच्या स्थानिक बोली भाषेत तज्ज्ञांशी संवाद साधून समस्या आणि त्यावरील उपाय विचारू शकतात. पिकांच्या एका फोटोद्वारे शेतक-याला अचूक सल्ला आणि सूचना मिळू शकते. ही एआयची कमाल आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news