महाराष्ट्र गौरव पुरस्काराने विविध क्षेत्रातील २५ कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव

परभणी : येथील जयहिंद सेवाभावी शिक्षण संस्था आयोजित महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा दि.९ मे रोजी पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील २५ कर्तृत्ववान व्यक्तींना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयात आयोजित पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष एम.एम. शेख होते. यावेळी माजी मंत्री गणेशराव दुधगावकर, विशेष सत्कार मूर्ती महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, प्रमुख पाहुणे प्रसिद्ध हिंदी कवी इम्रान राही (वर्धा), इंजि. आर.डी. मगर, अहमद चाऊस, हाजी शेख शेरू, खदिरलाला हाश्मी यांची उपस्थिती होती.

या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या २५ मान्यवरांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महापौर व उपमहापौर यांचा विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने माजी मंत्री दुधगावकर, इमरान राही, इंजि. आर. डी. मगर यांची भाषणे झाली.

प्रास्ताविक जयहिंद सेवाभावी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सत्तार इनामदार यांनी केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. इब्राहिम बक्ष आझाद यांनी तर आभार इनामदार यांनी मानले. यशस्वीतेसाठी शाईन जब्बार थारा, शेख शरीफ भाई, शफिक शेख, तब्बू पटेल, योगेश मुळी, तसलीम खतीब यांनी परिश्रम घेतले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident News|अलगरवाडीजवळ मृत्यूचा थरार; तिहेरी अपघातात तिघांचा बळी!
00:29
Video thumbnail
Latur|गॅस महाग, लाकूड महाग;हॉटेल व्यवसायिकांचे कंबरडे मोडले!
02:17
Video thumbnail
Latur Accident|खंबाळवाडीजवळ भीषण अपघात; एअरबॅगमुळे वाचले प्राण
01:01
Video thumbnail
Ambadas Danve On Devendra Fadnavis|मुख्यमंत्र्यांनी दिलेला बैल आजारीच!" दानवेंचा गंभीर आरोप
04:52
Video thumbnail
Latur|ठाकरे गटाच्या बैठकीतच राडा; व्यासपीठावर शिवसैनिक भिडले!
00:53
Video thumbnail
'भारत भाग्य विधाता' चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला कंगना रणौतची ग्लॅमरस हजेरी!
00:42
Video thumbnail
जेव्हा सचिन तेंडुलकर विमानातच क्रिकेट खेळू लागला...!
00:42
Video thumbnail
कोल्हापूरकरांसाठी अभिमानाचा क्षण: अंबाबाई मंदिराच्या शिखरावर झळकणार अडीच कोटींचा सुवर्णकळस
00:43
Video thumbnail
Latur Accident|निटूरमध्ये भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू
01:12
Video thumbnail
Latur Farmar News|पत्नीसोबत स्वतः नांगर ओढणाऱ्या शेतकऱ्याला अखेर मिळाला बैल!
01:38
Video thumbnail
Latur -बसस्थानकात सोनसाखळी चोरणारी महिला काही तासांत जेरबंद! #marathilivenews #Latur #police
00:41
Video thumbnail
Bus Accident|उदगीर-अहमदपूर मार्गावर मोठा अपघात#marathilivenews #maharashtranews #breakingnews
01:18
Video thumbnail
लातूर - मिनी मार्केट जवळील पेट्रोल पंपावर स्कूटीने घेतला अचानक पेट #marathilivenews #maharashtranews
00:42
Video thumbnail
Latur|चोला फायनान्सचा मॅनेजर लाखो रुपये घेऊन फरार?
06:08
Video thumbnail
Latur|मोदी सरकारचा मोठा निर्णय? उज्ज्वला महिलांना बसला धक्का!
04:49

Latest news