नांदेड : प्रतिनिधी
गोपाळ चावडी – बाबुळगाव रस्त्यावरील शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलीस पथकाने छापा टाकला. त्यात ७ जुगा-यांवर कारवाई करून ५ लाख ५ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने ९ मे रोजी गोपाळ चावडी – बाबुळगाव रस्त्यावरील शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
यात जुगारी दिनेश लक्ष्मणराव जोंधळे (रा. जुना मोंढा ), गुलाब सदाशिव घोरबांड (रा. ज्ञानेश्वर नगर, सिडको), विजय हरिभाऊ पाटील (रा. वात्सल्य नगर सोसायटी, हडको), दत्तराव गोविंदराव फुलकाने (रा. हिंगणी ता. माहूर), संजय बालाजी शिंदे (रा. गोपाळ चावडी), संजय निवृत्ती जोंधळे (रा. नावघाट), आनंदा नागोराव हैबतकर (रा. गोपाळ चावडी) यांना पकडले. यावेळी पथकाने ५ दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ५ लाख ५ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

