२०० कोटींच्या कथित मनरेगा भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करा

लातूर : प्रतिनिधी
चाकूर तालुक्यातील मनरेगा योजनेतील कथित भ्रष्टाचार, प्रलंबित देयके, पिक विमा व शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील चाकूरकर हे शेतक-यांसह सोमवार दि. २० जुलै पासून चाकूर येथील जुने बसस्थानकासमोरील कमानीजवळ आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती बालाजी पाटील चाकूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चाकूर तालुक्यातील शेतक-यांच्या विविध प्रश्नांबाबत वेळोवेळी शासन व प्रशासनाकडे निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शेतक-यांना न्याय मिळावा आणि संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी  आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्याचे चाकूरकर यांनी सांगितले.
चाकूर, अहमदपूर व शिरूर अनंतपाळसह राज्यातील नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रातील शेतक-यांनाही मनरेगा योजनेचा लाभ लागू करण्यात यावा. चाकूर, अहमदपूर व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतक-यांचा २०२५-२६ चा पिक विमा तात्काळ मंजूर करून वितरित करण्यात यावा. विहीर, गोठे, घरकुल आदी कामे पूर्ण करूनही प्रलंबित असलेली सर्व बिले तातडीने अदा करण्यात यावीत. अशा मागण्या त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहेत. या पत्रकार परिषदेला अविनाश जाधव, मुरलीधर माने, गोविंद गवळी, पंढरी हादवे, सुरेश कांबळे, तुकाराम कोरके, राम कांबळे आदी उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news