लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर आणि परिसरातील गावांना जोडणारी प्रमुख वाहिनी असलेल्या लातूर शहर महानगरपालिकेच्या सिटी बस सेवा गेल्या ५ ते ६ दिवसांपासून बंद झाली होती. परंतु, लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने यातून मार्ग काढल्याने सिटी बस सेवा पुन्हा सुरु झाली आहे.
लातूर शहर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडून शहरात सिटी बस सेवा दिली जाते. राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयानूसार महिलांना सिटी बसचा प्रवाास मोफत आहे. महिलांना सिटी बसची सेवा मोफत देणारी लातूर महापालिका एकमेव आहे. सिटी बसची यंत्रणा राबवणा-या एजन्सीचे बील थकल्याने कंत्राटदाराने सिटी बस सेवा बंद ठेवली होती. परंतु, महापालिका प्रशासनाने कंत्राटदाराशी चर्चा करुन मार्ग काढल्याने सिटी बस सेवा पुन्हा सुरु झाली आहे.
















