27 C
Latur
Friday, March 6, 2026
Homeधाराशिवतटकरेंची छावा संघटनेच्या पदाधिका-यांसोबत बैठक

तटकरेंची छावा संघटनेच्या पदाधिका-यांसोबत बैठक

धाराशिव : प्रतिनिधी
युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह छावा संघटनेच्या प्रतिनिधींना लातूरमध्ये काल (२० जुलै) बेदम मारहाण केली. त्यानंतर आज धाराशिव दौ-यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि छावा संघटनेचे पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली.

लातूरमध्ये काल झालेल्या राड्यानंतर आज सुनील तटकरे धाराशिव दौ-यावर आहेत. यावेळी सुनील तटकरेंची छावा संघटनेच्या पदाधिका-यांसोबत बैठक झाली. काल झालेली घटना अत्यंत चुकीची आहे, असं सुनील तटकरे यांनी यावेळी छावा संघटनेच्या पदाधिका-यांना म्हणाले. दरम्यान, लातूरमध्ये काल झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या आजच्या धाराशिव दौ-यातून सूरज चव्हाण यांना वगळण्यात आले आहे. लातूरमधील घटनेचे पडसाद धाराशिवमध्येही उमटण्याची शक्यता असल्याने सूरज चव्हाणांना दौ-यातून वगळण्यात आल्याचं सांगण्यात आले.

सुनील तटकरे आणि छावा संघटनेच्या पदाधिका-यांच्या बैठकीत एक पदाधिकारी म्हणाला की, काल लातूरमध्ये तुम्ही सर्व ऐकून घेतलं. मात्र त्यानंतर तुमच्याच एका पक्षाच्या पदाधिका-याने विजय घोटगे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, हे अशोभनीय आहे. आपण सत्तेत आहा, आज महाराष्ट्राची सत्ता तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचे मालक नाही. काल झालेल्या घटनेतील संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी छावा संघटनेच्या पदाधिका-यांनी केली. यावर शेवटी संघटना म्हणून तुम्ही शेतक-यांच्या भावना व्यक्त करताय. राज्यकर्ते म्हणून शांतपणे ऐकून घेणे आमचे कर्तव्य आहे. तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा नक्की विचार करु, असे सुनील तटकरेंनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR