मुंबई : सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरु आहे. यापुढे देशभरात नव्याने होणारी जनगणना व त्या अनुषंगाने वाढणारे लोकसभा व विधानसभा क्षेत्र यांची संख्या, म्हणजेच मोठया प्रमाणात खासदार व आमदारांची संख्या वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी मोठी मागणी केली आहे. पेंशन योजना कायमची बंद करायला हवी, अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे. माजी खासदार व माजी आमदार यांना पेंशन देण्याचे काहीच कारण नसल्याचे राजू पाटील म्हणालेत. तसेच प्रामाणिक करदात्या नागरिकांच्या पैशांची ही नासाडी थांबवावी असेही पाटील म्हणालेत.
सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. यापुढे देशभरात नव्याने होणारी जनगणना व त्या अनुषंगाने वाढणारे लोकसभा व विधानसभा क्षेत्र यांची संख्या, म्हणजेच मोठ्या प्रमाणात खासदार व आमदारांची संख्या वाढणार आहे. सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. यापुढे देशभरात नव्याने होणारी जनगणना व त्या अनुषंगाने वाढणारे लोकसभा व विधानसभा क्षेत्र यांची संख्या, म्हणजेच मोठ्या प्रमाणात खासदार व आमदारांची संख्या वाढणार आहे. एकंदरीत आपल्या देशात माजी खासदार व माजी आमदार यांना दिल्या जाणा-या पेंशन व इतर सुविधांचा भार पण भविष्यात वाढतच जाणार आहे.
खरंतर माजी खासदार व माजी आमदार (यात मी पण आलो. ) यांना पेंशन देण्याचे काहीच कारण नाही. प्रामाणिक करदात्या नागरिकांच्या पैशांची ही नासाडी थांबविण्यासाठी ही पेंशन योजना कायमची बंद करायला हवी. संसदेच्या विशेष अधिवेशनात याविषयावर पण चर्चा व्हायला हवी राजू पाटील म्हणाले. केंद्र सरकार २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांची पुनर्रचना करून लोकसभा सदस्य संख्या ५४३ वरून ८५० पर्यंत वाढवण्याच्या विचारात आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील खासदारांची संख्या ४८ वरून ७२ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील खासदारांची संख्या वाढणार?
लोकसभेत मांडल्या जाणा-या महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन कायदा आणि प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचनेमुळे लोकसभेतील खासदारांची संख्या वाढल्यानंतर महाराष्ट्रातील खासदारांचा आकडाही वाढणार आहे. महाराष्ट्रातून सध्या ४८ खासदार लोकसभेत जातात. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ही संख्या ७२ इतकी होईल म्हणजे महाराष्ट्रातून ७२ खासदार लोकसभेत जातील अशी शक्यता आहे.

