पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी आक्रमक; बॅरिकेड्स तोडून झारखंड विधानसभेकडे कूच

रांची : वृत्तसंस्था
झारखंड लोकसेवा आयोगाच्या भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहार व पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी आज (दि. १० ऑगस्ट) विधानसभेला घेराव घालण्याचा निर्धार केला आहे. विधानसभेवर मोर्चा काढणा-या आंदोलक विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स केली आहे. तरीही, विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स ओलांडून पुढे कूच केले आहे. एकूण सहा बॅरिकेड्स पैकी तीन बॅरिकेड्स तोडण्यात आली आहेत.

विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स ओलांडून पुढे कूच केले आहे. आपण शांततापूर्ण मार्गाने विधानसभेच्या दिशेने मोर्चा काढत असल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे नेते देवेंद्रनाथ महतो अ‍ॅम्बुलन्सने धुर्वा गोलचक्कर येथे पोहोचले. त्यानंतर ते अ‍ॅम्बुलन्सनेच विधानसभेच्या दिशेने रवाना झाले. देवेंद्रनाथ महतो आता इतर आंदोलक विद्यार्थ्यांसोबत विधानसभा मोर्चात सहभागी होणार आहेत.एकूण सहा बॅरिकेड्स पैकी तीन बॅरिकेड्स तोडण्यात आली आहेत. पोलिसांकडून पाण्याचे फवारे मारून आंदोलकांना पांगविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
रांचीच्या जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर गेली १७ दिवस आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांनी भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

याशिवाय २०१९ नंतर आयोजित केलेल्या सर्व JSSC CGL, JSSC JE  आणि PGT  परीक्षा रद्द कराव्यात आणि राज्य सरकारच्या नोकरभरती प्रक्रियेत सुधारणा करावी, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.परीक्षांमधील गैरव्यवहारास जबाबदार असणा-यांवर कठोर कारवाई करणे, वर्गनिहाय कटऑफ जारी करणे, ओएमआर प्रत व रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देणे तसेच यूपीएससी आणि एसएससीच्या धर्तीवर नियमित भरती कॅलेंडर प्रसिद्ध करणे याही विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. या मागण्यांवर अद्याप पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

झारखंड सरकारकडून विद्यार्थ्यांच्या सुमारे ९८ टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा करण्यात आला. मात्र, विद्यार्थ्यांनी सरकारचा हा दावा चुकीचा असल्याचे सांगत फेटाळून लावला. आपल्या प्रमुख मागण्यांवर अजूनही सहमती झालेली नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

आज क्रांतीचा दिवस : देवेंद्रनाथ महतो
छात्र नेते देवेंद्रनाथ महतो यांनी सांगितले, आज उपोषणाचा नववा दिवस असून मला कमालीचा अशक्तापणा आला आहे. माझी प्रकृती अधिकच खालावत चालली आहे. परंतु, मला सध्या जो त्रास आणि वेदना होत आहेत, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेदना पेपर लीक झाल्यामुळे होत आहेत. विधानसभा घेरावाबद्दल बोलताना देवेंद्रनाथ महतो म्हणाले, आज क्रांतीचा दिवस आहे. आपल्या महिन्यांच्या संघर्षाचा हा दिवस आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|पाणी चोरी थांबवण्यासाठी मनपाची कारवाई; ग्रामस्थ आक्रमक
01:54
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:38
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या निधनाने लातूर हळहळले; अंत्यदर्शनासाठी गर्दी
05:19
Video thumbnail
Latur|काँग्रेस-राष्ट्रवादीचे बेरोजगार आंदोलन करत आहेत’; अभिमन्यू पवारांचा दावा
10:32
Video thumbnail
Latur|उद्योजक अक्षय शाह यांच्या हस्ते एकमत परिवारातील श्रीगणेशाची आरती
04:04
Video thumbnail
Latur|ज्येष्ठ काँग्रेस नेते मोईजभाई शेख यांचे दुःखद निधन
01:29
Video thumbnail
Nanded|माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
04:13
Video thumbnail
Ground Report|जिल्हा परिषदेसमोरच वाहतूक नियमांची ऐसीतैशी; पोलिस प्रशासन झोपलंय का?
07:20
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
11:29
Video thumbnail
Latur|पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
04:24
Video thumbnail
Nanded|बिलोलीत आयशर चालकाला बेदम मारहाण! VIDEO व्हायरल
01:12
Video thumbnail
Nanded|शिवणी आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत? 100-150 रुग्णांची गैरसोय
01:58
Video thumbnail
Latur|ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी
05:21
Video thumbnail
Latur|लातूर जि.प. अध्यक्षांच्या बंगल्यात चोरी; पोलिसांसमोर मोठं आव्हान
06:55
Video thumbnail
Latur|पिकं संकटात, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न; छावा संघटनेचं उपोषण
10:32

Latest news