ही शेवटची नम्र विनंती ;दादागिरी करणा-या अमराठी मुजोर रिक्षाचालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा शेवटचा प्रयत्न

मुंबई : प्रतिनिधी
मराठी सक्तीवरून आंदोलने करणा-या अमराठी रिक्षाचालकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिला आहे. काल कांदिवली लिंक रोडवर लालजी पाडा येथे रिक्षाचालकांनी बेकायदा आंदोलन केले. त्यांनी रिक्षा रोखून ट्रॅफिक जॅम केले. मराठी बोलणार नाही अशी मुजोरी हे रिक्षाचालक दाखवत होते. आता या अमराठी रिक्षाचालकांविरोधात मनसेने दंड थोपटले आहेत. कांदिवली पश्चिममध्ये मनसेने अमराठी रिक्षाचालकांना इशारा दिला आहे. ‘मराठी शिकण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा, ही शेवटची नम्र विनंती’. संप करून मुंबईकरांना वेठीस धरल्यास मनसे गप्प बसणार नाही असा इशारा बॅनरवरून देण्यात आला आहे.

मनसेने कांदिवली पश्चिममध्ये अमराठी रिक्षाचालकांना इशारा देणारे बॅनर लावले आहेत. ‘अमराठी रिक्षाचालकांना विनंती आहे, मराठी शिकण्यात व बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा!’ असे या बॅनरवर लिहिले आहे. मात्र संप आणि आंदोलन करून मुंबईकरांना वेठीस धरले तर मनसे गप्प बसणार नाही, ही शेवटची नम्र विनंती. मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी हे बॅनर लावले असून अमराठी चालकांनी मराठीचा सन्मान करावा असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान अमराठी रिक्षाचालकांवर सुरू असलेल्या कारवाई दरम्यान मोठ्या संख्येने अमराठी ऑटो रिक्षाचालक बोरीवली आरटीओ कार्यालयात जमा झाले आहेत. काल मुंबईच्या वेगवेगळ्या भागात अमराठी रिक्षाचालकांनी आरटीओच्या कारवाईला विरोध करत संप पुकारला होता. या संपादरम्यान अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. आरटीओकडून मराठी भाषा संदर्भात सुरू असलेल्या कारवाईमुळे अमराठी चालकांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर आज मोठ्या संख्येने ऑटो रिक्षाचालक बोरीवली आरटीओ कार्यालयात जमा झाले आहेत.
किमान मराठी बोलता यावे, अशी या रिक्षाचालकांकडून अपेक्षा आहे. पण व्यावहारिक मराठी सुद्धा न बोलणा-या रिक्षा चालकांविरोधात कारवाई सुरू झाली आहे.
 

 

 

 

 

 

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55

Latest news