‘अमर रहे, अमर रहे, समाधान मधाळे अमर रहे’ची घोषणा

निलंगा : लक्ष्मण पाटील
निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील जवान समाधान महिपती मधाळे यांच्यावर बुधवारी दि. २१ ऑक्टोबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमर रहे अमर रहे समाधान मधाळे अमर रहे!’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. ग्रामस्थांनी आपल्या वीर सुपुत्राला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. त्यांच्या निधनाने कासार बालकुंदासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

समाधान मधाळे हे जम्मू-काश्मीर येथे भारतीय सैन्याच्या ७ महार रेजिमेंटमध्ये कर्तव्य बजावत होते. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे सात वाजता त्यांना हृदयविकाराने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच गावावर दु:खाचा डोंगर कोसळला.समाधान मधाळे यांच्या पश्चात आई बालिका महिपती मधाळे, पत्नी पल्लवी, पाच वर्षांची मुलगी सानवी, भाऊ दत्ता व शांतकुमार, भावजय शालिनी व पूनम असा परिवार आहे. अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. देशसेवेचा ध्यास, कर्तव्याप्रती निष्ठा आणि मातृभूमीवरील प्रेम जपणा-या समाधान मधाळे यांच्या निधनाने गावाने कर्तव्यनिष्ठ सुपुत्र गमावला आहे. त्यांच्या स्मृती कायम जपण्याचा निर्धार व्यक्त करत ग्रामस्थांनी अश्रूंच्या धारा आणि अमर रहे अमर रहेच्या घोषणांत आपल्या लाडक्या जवानाला अखेरचा निरोप दिला

यावेळी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल धुमे पाटील, तहसीलदार शिवाजी कदम, एपीआय गरजे, एपीआय वाघमारे, पीएसआय माळवदकर, मंडळ अधिकारी सूरज स्वामी, ग्रामविकास अधिकारी बालाजी नलमले, ग्राममहसूल अधिकारी पाटील, कर्नल पांढरे, कॅप्टन कृष्णागिरी, कॅप्टन रमेश तांबोळे यांच्यासह लातूर व धाराशिव जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी, पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani News|ताडकळसमध्ये हरणाच्या पाडसावर कुत्र्यांचा हल्ला; शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मदत
01:18
Video thumbnail
Nanded News|आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला रोहित पवारांचा आधार
05:38
Video thumbnail
Latur News|निलंगेकर बंधूंवर अभय साळुंके यांचा गंभीर आरोप! विक्टोरिया कंपनी प्रकरणाची कागदपत्रे सादर
03:36
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अजय देहाडे यांच्या भीमगीतांची मेजवानी! भीमसैनिकांचा उत्साह शिगेला
08:44
Video thumbnail
Latur|लातूरच्या आंबेडकर पार्कवर खासगी वाहनांचे अतिक्रमण? भीमसैनिक आक्रमक; आंदोलनाचा इशारा
01:50
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख बिनविरोध
02:46
Video thumbnail
Latur District Bank Election 2026|धीरज देशमुख यांची लातूर जिल्हा बँकेत बिनविरोध निवड
01:31
Video thumbnail
Latur Crime News|शेकडो नागरिकांसमोर युवकावर कोयत्याने वार; औसा शहरात खळबळ
00:54
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दसरा उत्सव | हल्ला मोहल्ला आणि भव्य नगरकीर्तन
04:43
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते ‘मिरा सारीज’चे थाटात उद्घाटन
03:33
Video thumbnail
Vijayadashami 2026|बाभळगावात धीरज देशमुख, श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पारंपरिक अश्वपूजन
01:41
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
44:57
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात | संजय बनसोडे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण
02:22
Video thumbnail
Nanded|माहूरगडावर व्हीआयपी दर्शनामुळे वाहतूक कोंडी? संतप्त भाविकाने आमदाराच्या गाडीची काच फोडली
01:39
Video thumbnail
Latur|जळकोट पोस्ट ऑफिसमध्ये दिव्यांगांची हेळसांड; प्रशस्त जागेत स्थलांतर करण्याची मागणी
01:29

Latest news