Homeलातूरआमदार अमित देशमुख यांच्या हस्ते अरण्या कलेक्शनचे उद्घाटन

आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते अरण्या कलेक्शनचे उद्घाटन

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. २७ एप्रिल रोजी सायंकाळी लातूर शहरातील मेन रोडवरील लक्ष्मीकांत कर्वा यांच्या मान्यवर वस्त्रदालनातील अरण्या कलेक्शनचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मान्यवरांसह दालनाची पाहणी केली.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे, उपमहापौर स्नेहल उटगे, स्थायी समितीचे सभापती सचिन बंडापल्ले, माजी महापौर दीपक सुळ, डॉ. चेतन सारडा, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. सतीश देशमुख, डॉ. पवन लड्डा, डॉ. विक्रम सारडा, डॉ. अजय पुनपाळे, अभिजीत देशमुख, लक्ष्मीकांत कर्वा, योगेश कर्वा, अर्पित कर्वा, चिन्मय कर्वा, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन  विजय देशमुख, संतोष देशमुख, गणेश एसआर देशमुख, फैसलखान कायमखानी, लक्ष्मीकांत सुद, संजय निलेगावकर, प्रसाद उदगीरकर, आनंद लाहोटी, सुदेश ब्रिजवासी, मिनू अग्रवाल, अजय शहा, विशाल जाधव, इसरार सगरे, सोनू डगवाले, बंडू किसवे, रतन बिदादा, व्यंकटेश पुरी, मुक्तार शेख, इस्माईल शेख, चापसी, आसिफ बागवान, प्रा. प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, शरद देशमुख, महेश देशमुख, अरूण तापडिया, रिषभ ब्रिजवासी, रितेश माने, सागर बोरा, दत्ता अंबेकर, सोनू दोंतिलवार, राधेशाम धुत, जयेश बजाज, दीपक वारद, विजय रांदड, प्रफुल्ल जैन, रतन बिदादा, राजू मिणियार आदीसह कर्वा कुटुंबीय मित्रपरिवार काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, मान्यवर दालन सुरू करण्याची कल्पना काही वर्षांपूर्वी लक्ष्मीकांत कर्वा यांनी मला सांगितली होती. कर्वा परिवाराचा नेहमी आगळे वेगळे करण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. देशमुख व कर्वा कुटुंबीयांचे नाते हे पिढ्यानपिढ्याचे आहे. आपण एका गावचे एका मातीतील आहोत हा विचार अधिक बळकट इतर विचारापेक्षा आहे. हेतू शुद्ध ठेवून जे व्यवसायात पडतात त्यांना यश हमखास मिळते या दालनाच्या विक्रीचा स्ट्राइक रेट हा सर्वाधिक आहे. लातूरमध्ये चांगल्या गोष्टीला पाठिंबा लातूरकर देतात. लातूर शहराच्या जडणघडणीत व विकासात प्रत्येकाचे योगदान आहे लातूरमध्ये प्रत्येकाला आपले स्वप्न साकारण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू, येणा-या काळात मान्यवर दालनाचा विस्तार व्हावा, असे सांगून कर्वा कुटुंबीयांना व्यवसाय वाढीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ओमप्रकाश झुरळे यांनी केले तर प्रास्ताविक चिन्मय लक्ष्मीकांत कर्वा यांनी करून मान्यवर ब्रँडची सविस्तर माहिती दिली तर लक्ष्मीकांत कर्वा यांनी मनोगत व्यक्त केले तर शेवटी आभार अर्पित कर्वा यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR