Homeलातूरग्रामीण रस्ते मुख्य रस्त्यांना जोडणार

ग्रामीण रस्ते मुख्य रस्त्यांना जोडणार

चाकूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील रस्ते मुख्य रस्त्यांना जोडून ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. बोथी येथे १ कोटी ४ लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर पिटले हे होते. मंचावर स्वागताध्यक्ष बळीराम पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, सिद्धी शुगर अलाईट इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, चापोलीचे सरपंच डॉ.भालचंद्र चाटे, पंचायत समितीचे उपसभापती भुजंग शिंदे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, माजी नगराध्यक्ष मिलिंदराव महालिंगे, माजी जिल्हा परिषद  सदस्य सुदर्शन मुंडे, जेष्ठ नेते बालाजी सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष  संदीप शेटे, मच्छींद्र नागरगोजे, पद्माकर पाटील, अनिल वाडकर ,मधुकर कांबळे, अर्जुन मद्रेवार, गणपत नितळे, गणपत कवठे, सिद्धेश्वर अंकलकोटे, देविदास माने,  अशोक पाटील, मधुकर मुंडे, अंतेश्वर पाटील, धनाजी राठोड, मेघराज पाटील, राजाराम करले, नाथा मद्रेवार, विश्वनाथ पाटील, नारायण काचेसह विविध मान्यवर उपस्थित होते.
सहकारमंत्री नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, आगामी काळात जलतारा हा प्रकल्प शेतक-यांसाठी वरदान ठरणार असून सर्व शेतक-यांनी हा प्रकल्प आपल्या शेतात राबवला पाहिजे. यासाठी आपल्या सिद्धी शुगर साखर कारखान्याकडून मदत व मार्गदर्शन केले जाईल. बोथीच्या विकासासाठी मी कधीही कमी पडणार नाही लागेल तेवढा निधी विकास स्वरूपात आपण देऊ, अशी ग्वाहीही सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष बळीराम पाटील यांनी केले. यावेळी सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, चापोलीचे सरपंच भालचंद्र चाटे यांनी समायोचित मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर कांबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी बोथी गावातील सरपंच बालाजी आवळे चेअरमन सूर्यकांत केंद्रे, परमेश्वर नवगण, सुर्यकांत डिगोळे, गोविंद घुगे, बाळासाहेब पाटील, धर्मपाल पवार, उपसरपंच संतोष घुगे, प्रगतशील शेतकरी राजाराम महात्मे, बालाजी  शेवाळे, शेषेराव कांबळे, सुदर्शन गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR