Homeलातूरआमदार अमित देशमुख यांनी कल्याण ज्वेलर्सला दिली सदिच्छा भेट

आमदार अमित देशमुख यांनी कल्याण ज्वेलर्सला दिली सदिच्छा भेट

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २८ एप्रिल रोजी सकाळी लातूर शहरातील लोकमान्य टिळक चौकातील अजयसिंह राजपूत व विक्रमसिंह सौदागर यांच्या कल्याण ज्वेलर्सला सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.
यावेळी लातूरचे उपमहापौर अ‍ॅड. स्नेहल उटगे, मनपा सभागृहनेते विजयकुमार साबदे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील पडिले, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, फैसलखान कायमखानी, अमर राजपूत सीए श्याम धुत, सीए अशोक धुत, डॉ. दीपक गुगळे, विष्णूदास धायगुडे, व्यंकटेश पुरी, इसरार सगरे, रवींद्र काळे, एकनाथ पाटील, धनराज बजाज, गिरीश ब्याळे, प्रा. बसवराज धरणे, पांडुरंग किसवे, सत्यवान कांबळे, सुनील बसपुरे, सतीश हलवाई, आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी राजपूत व सौदागर कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूरमध्ये कल्याण ज्वेलर्स सारखी नामांकित व्यवस्था सुरू झालेली आहे. आपण सर्वजण लातूरचे भूमिपुत्र आहोत. या भूमीत प्रगती होते तेव्हा आपणाला आनंद होतो. मला आज राजपूत सरांची आठवण होते, देशमुख व राजपूत कुटुंबीयांचे नाते हे पिढ्यानपिढ्याचे आहे. लातूरमध्ये लातूरपण आपण सर्वांनी जपल आहे येणा-या काळात लातूरचा अधिक विस्तार होईल, लातूरकर गुण्या गोविंदाने नांदतात हीच लातूरची संस्कृती आहे, लातूरमध्ये व्यवसाय करायला पोषक वातावरण आहे, असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR