‘आयटी’ संकटात; ३०-४५ वर्षे वयोगटातील कर्मचारी असुरक्षित

पुणे : प्रतिनिधी
नोकरी जाण्याची सततची भीती, मध्यमवयीन कर्मचा-यांवरील वाढता दबाव, सरकारी संरक्षणाचा अभाव आणि संशोधन-नवकल्पनांवरील अपुरी तजवीज या प्रमुख आव्हानांचा सामना करणारे ‘आयटी’ क्षेत्र सध्या संकटात असल्याचे चित्र आहे. पुण्यालगतच्या हिंजवडी परिसरातील आयटीयन्स सध्या या ताण-तणावांना सामोरे जात आहेत.

अनुभवी कर्मचा-यांच्या जागी कमी पगारातील उमेदवारांना प्राधान्य दिल्याने ३० ते ४५ वर्षे वयोगट सर्वाधिक असुरक्षित ठरत आहे. अनेकांना सक्तीने राजीनामा द्यावा लागतो, तर काही जणांना नव्या नोकरीसाठी महिनोन्महिने प्रतीक्षा करावी लागत आहे.

कर्मचारी कपातीदरम्यान पारदर्शकता, नोकरी संपल्याची भरपाई आणि बेरोजगारी भत्ता अशा संरक्षणात्मक व्यवस्थांचा अभाव असल्याने आयटी कर्मचा-यांना कोणताही आधार मिळत नाही. काही कंपन्यांकडून कर्मचा-यांच्या पार्श्वभूमी तपासणीबाबत भीती दाखविली जात आहे. त्यामुळे आयटी कर्मचा-यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे.

बहुतांश आयटी कंपन्या आउटसोर्सिंग, कॉस्ट कटिंग आणि शॉर्ट-टर्म बिलिंग मॉडेलवर चालत असल्याने एआय, सायबर सिक्युरिटी, सेमीकंडक्टर व रोबोटिक्ससारख्या क्षेत्रात मागे पडत आहेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी मजबूत कामगार संरक्षण कायदे, देशव्यापी कौशल्यवृद्धी मोहीम, संशोधन-नवकल्पनांना मोठा निधी आणि मध्यमवयीन कर्मचा-यांसाठी दुस-या करिअरच्या संधी उपलब्ध करणे गरजेचे असल्याचे मत आयटीयन्सकडून व्यक्त केले जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news