उजनी धरण ५० टक्के भरले

२६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा, धरणात आवक वाढली

उजनी धरण : सिद्धेश्वर शिंदे
भीमा नदीच्या वरच्या खो-यात झालेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून धरण सध्या ५० टक्के भरले आहे. धरणात २६ टीएमसी उपयुक्त (जिवंत) पाणीसाठा उपलब्ध झाला असून यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पिण्याचे पाणी, शेती आणि उद्योगांसाठी दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांत दौंड बंधा-यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने उजनी धरणात मोठी आवक झाली. त्यातून धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. मात्र, सध्या विसर्ग कमी झाल्याने पाण्याची पातळी ५० टक्क्यांच्या आसपास स्थिरावली आहे. सध्या धरणात एकूण ४८.७५ टीएमसी पाणीसाठा असून त्यापैकी २६.१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. भीमा खो-यात पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास धरणातील साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.

यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उजनी धरण परिसरात केवळ ८८ मिमी पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी याच कालावधीत २८१ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे स्थानिक पावसापेक्षा भीमा खो-यातील पावसावरच उजनीच्या जलसाठ्याचे भवितव्य अवलंबून असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दमदार पावसाची आवश्यकता
गेल्या सहा वर्षांत उजनी धरणाने विविध तारखांना ५० टक्के पाणीसाठा गाठला होता. यंदाही जुलैच्या सुरुवातीलाच हा टप्पा गाठल्याने समाधान व्यक्त होत असले तरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी वरच्या खो-यात सातत्याने चांगल्या पावसाची आवश्यकता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news