32.8 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमनोरंजनए.आर.मुरूगादास सोबत सलमान करणार काम

ए.आर.मुरूगादास सोबत सलमान करणार काम

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘टायगर -३’ या चित्रपटाला चांगल यश मिळाले होते. या यशानंतर सलमान खानने त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल मोठो घोषणा केली आहे. सलमान पुढच्या चित्रपटासाठी साऊथचा प्रसिध्द दिग्दर्शक ए.आर.मुरूगादास यांच्यासोबत काम करणार आहे.

सलमानले सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून म्हटलनने की, माझा आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक ए.आर.मुरूगादास असून, हा चित्रपट यांच्यासोबत असून लिहिले आहे की हा चित्रपट २०२५ च्या ईद दरम्यान प्रदर्शित होईल. सलमानच्या या पोस्टनंतर सलमानचे चाहते या चित्रपटासाठी आतापासूनच खूप उत्सुक झाले आहेत.

सलमान खानने मंगळवारी १२ मार्च रोजी त्याच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया हँडलवर ही घोषणा केली. हा चित्रपट २०२५ च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. सलमान खान नेहमीच त्याच्या चाहत्यांना खूश करण्यासाठी काहीतरी खास करत असतो.

पुन्हा एकदा, सलमान ईदला चाहत्याचे मनोरंजन करणार आहे. सलमानच्या या आगामी चित्रपटाची निमीर्ती साजिद नाडियादवाला करणार असून ए.आर.मुरूगादास दिग्दर्शक करणार आहे. ए. आर. मुरुगादास साऊथचा मोठा दिग्दर्शक आहे. त्याने गजनी, स्टॅलिन, थुप्पाक्की आणि कठ्ठी असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR