38.7 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeपरभणीरावसाहेब दानवेंचा प्रचाराचा ‘बैलगाडा’

रावसाहेब दानवेंचा प्रचाराचा ‘बैलगाडा’

डोळ्याला गॉगल, डोक्यावर गमजा, पांढरा सदरा आणि हातात बैलगाडीचा कासरा

परभणी : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून त्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारांना आवाहन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करताना दिसतोय. अशाच पद्धतीचा एक हटके अंदाज रविवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पाहायला मिळाला.

डोळ्यावर गॉगल, डोक्यावर गमजा आणि हातात बैलगाडीचा कासरा घेत रावसाहेब दानवेंनी आज बैलगाडीतून प्रचार केला. त्यावेळी त्यांच्यामागे परभणीचे उमेदवार महादेव जानकर आणि आमदार मेघना बोर्डीकर या देखील होत्या.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज परभणीच्या सेलू तालुक्यात होते. यावेळी त्यांनी चारठाणा येथे बैलगाडीतून फेरी मारली. त्या गाडीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर तसेच आमदार मेघना बोर्डीकरही बसल्या होत्या. हातात कासरा धरून रावसाहेब दानवे हे बैलगाडी चालवत होते, तर त्यांच्या पाठीमागे महादेव जानकर उभे होते. आजूबाजूने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते घोषणा देत होते. शिट्टी वाजवत सर्वांनी महादेव जानकर यांना मतदान करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR