35 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeपरभणीअपक्ष उमेदवार अनिल मुदगलकर यांचा महायुतीला पाठिंबा जाहीर

अपक्ष उमेदवार अनिल मुदगलकर यांचा महायुतीला पाठिंबा जाहीर

परभणी : भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा परभणी नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनिल मुदगलकर यांनी आज आपला पाठिंबा महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना जाहीर केला आहे. मुदगलकर हे अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेच्या निवडणुक रिंगणात उभे होते. माझ्या मतदारांनी महायुतीचे जानकर यांना मतदान करण्याचे आवाहन मुदगलकर यांनी केले आहे.

अपक्ष उमेदवार म्हणून मुदगलकर यांनी प्रचार जोरात सुरू केला होता. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दि.२३ रोजी मुदगलकर यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि महायुतीच्या उमेदवारास आपण पाठिंबा जाहीर करावा अशी मागणी केली. त्यानंतर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मुदगलकर यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या वार्डचा विकास व्हावा या प्रमुख उद्देशाने आज महायुतीचे उमेदवार जानकर यांना पाठिंबा दिला आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, विजयभाऊ वरपुडकर, प्रमोद वाकोडकर, आ. मेघना बोर्डीकर, माजी नगरसेवक सुनील देशमुख यांनी मुदगलकर यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुदगलकर यांनी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विश्वास ठेवून मी पाठिंबा देत असल्याचे सांगितले. तसेच मतदारांनी महायुतीचे उमेदवार जानकर यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR