35 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeपरभणीसंविधानामुळेच मी मंत्री झालो : रावसाहेब दानवे

संविधानामुळेच मी मंत्री झालो : रावसाहेब दानवे

परभणी : भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार असा अपप्रचार विरोधी पक्षाचे नेते करीत आहेत. परंतू संविधानामुळेच निवडणूक होत असून संविधानामुळेच मी मंत्री झालो. मग संविधान कसे बदलणार हे विरोधी पक्षाला समजायला पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे रविवार, दि. २१ एप्रिल रोजी महायुतीचे परभणी लोकसभा उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचार निमित्त चारठाणा येथील पेठ विभागात महात्मा बसवेश्वर महाराज चौकात दुपारी १ वाजता सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे बोलत होते.

यावेळी आ. मेघना साकोरे बोर्डीकर, युवानेते इंद्रजीत घाटुळ, भाजपा तालुकाध्यक्ष विनोद राठोड, सरपंच अनिरुद्ध चव्हाण, पुनम तमशेटे, संगीता जाधव, प्रदिप धुमाळ, सुरेश देशपांडे अदीची उपस्थिती होती. पुढे बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ लाख गरिब नागरिकांना मोफत धान्य सुरू केले आहे. तर ४० हजार गोरगरिबांना घरकुले दिले. तसेच सव्वा लाख महिलांना १०० रुपयांमध्ये उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. शेतक-यांना १ रुपयांमध्ये पंतप्रधान पिक विमा सुरू केला आहे.

गोरगरिबाच्या हिताचे अनेक कामे सरकारने केली असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. तत्पूर्वी टि.पाईंन्ट पासून बसस्थानक पर्यंत दुचाकी रॅली व बसस्थानक परिसरात जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर बसस्थानक ते पेठ विभागा पर्यंत बैलगाडीने भव्य दिव्य रॅली काढण्यात आली होती. या बैलगाडीमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. मेघना बोर्डीकर, परभणी लोकसभा महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची मुख्य रस्त्यामधून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी सुभाष पवार, शिवशंकर तमशेटे, गणेश पारवे, सय्यद खलील अशोक राठोड, प्रभाकर कु-हे, गजानन गडदे, श्रीपाद देशपांडे, अणा मुळे, बालाजी कटारे, कृष्णा घाटुळ, बाळासाहेब मस्के, जनार्दन वानरे आदीची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. सूत्रसंचालन मतीन तांबोळी यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR