20.5 C
Latur
Thursday, November 6, 2025
Homeउद्योगचीनमध्ये ‘फ्लाइंग कार’च्या उत्पादनास सुरूवात!

चीनमध्ये ‘फ्लाइंग कार’च्या उत्पादनास सुरूवात!

एरोहॉट । वाहतुकीच्या व्यावसायिकीकरणाच्या दिशेने मोठी झेप; वार्षिक उत्पादन क्षमता १०,००० विमान मॉड्यूल्स

बीजिंग : वृत्तसंस्था
चीनच्या अग्रगण्य ईलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने ‘उडणा-या कार’चे उत्पादन सुरू केले आहे. हे पाऊल टेस्ला आणि अमेरिकन कंपनी एलेफ यांच्या प्रकल्पांपूर्वी टाकल्यामुळे जागतिक वाहन उद्योगात उत्सुकता निर्माण झाली आहे. चीनमधील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक एक्सपेंग मोटर्सची सहयोगी कंपनी ‘एक्सपेंग एरोहॉट’ने जगातील पहिल्या ‘इंटेलिजंट फ्लाइंग कार फॅक्टरी’मध्ये हे उत्पादन सुरू केले.

ही उडणारी कार पुढील पिढीच्या वाहतुकीच्या व्यावसायिकीकरणाच्या दिशेने एक मोठी झेप मानली जात आहे. दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग शहरातील ग्वांगझूच्या हुआंगपू जिल्ह्यातील १.२ लाख चौरस मीटरच्या कारखान्यात ‘लँड एअरक्राफ्ट कॅरियर’ नावाचे पहिले वेगळे करता येणारे ईलेक्ट्रिक विमान मॉड्यूल तयार करण्यात आले आहे. या कारखान्याची वार्षिक उत्पादन क्षमता १०,००० विमान मॉड्यूल्स इतकी आहे, तर सुरुवातीला दरवर्षी ५,००० युनिट्स तयार करण्याची क्षमता असेल.

टेस्लानेही स्वत:च्या उडणा-या कारचा प्रकल्प सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. इलॉन मस्क यांनी सांगितले की, ही कार आतापर्यंतच्या सर्वात लक्षात राहणा-या उत्पादनांपैकी एक ठरेल. टेस्लाची उडणारी कार पुढील काही महिन्यांत प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, अमेरिकन कंपनी एलेफ एरोनॉटिक्सनेही अलीकडेच स्वत:ची उडणारी कार चाचणीसाठी सादर केली असून, तिचे व्यावसायिक उत्पादन लवकरच सुरू होणार आहे.

पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झाल्यावर दर ३० मिनिटांनी एक विमान असेंबल होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. ही वाहने चालकांद्वारेच चालवली जाणार असून, चालकांकडे वाहन चालवण्याचा परवाना आणि हलक्या विमानांचा परवाना (लायसन्स) दोन्ही असणे आवश्यक असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR