हायब्रिड गाड्यांमुळे प्रदूषण; उ. प्रदेशने रोखली सबसिडी

लखनौ : वृत्तसंस्था
हायब्रिड वाहने इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा जास्त प्रदूषण करत असल्याचे एका उच्चस्तरीय बैठकीत स्पष्ट झाले आहे. इलेक्ट्रिक वाहने हायब्रिड वाहनांच्या तुलनेत ७०% कमी प्रदूषण करतात आणि त्यांची कार्यक्षमताही चांगली आहे. यामुळे शून्य कार्बन उत्सर्जन धोरणाला गती देण्यासाठी आणि केवळ इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी योगी सरकारने हायब्रिड वाहनांची सबसिडी रोखण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये हायब्रिड वाहनांवर सबसिडी देण्यात येत होती. यामुळे गेल्या वर्षभरात राज्यात १४,३७५ इलेक्ट्रिक तर २०,५६८ पेक्षा जास्त हायब्रिड गाड्या विकल्या गेल्या होत्या. २०२३-२४ मध्ये हायब्रिड श्रेणीतील वाहनांचा विक्री हिस्सा केवळ २.७% होता, जो गेल्या वर्षी ५९% टक्के एवढा झाला होता. केवळ सबसिडीचा लाभ घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात हायब्रिड वाहने खरेदी करत होते, पण ही वाहने पूर्णपणे प्रदूषणमुक्त नसल्याने शून्य उत्सर्जन धोरणाचा उद्देश सफल होत नव्हता. अनेक राज्यांनी (उदा. हरियाणा, राजस्थान, चंदीगढ) हायब्रिड वाहनांना दिलेली सबसिडी २५% ते ५०% पर्यंत कमी केली आहे.

काही संशोधनात ईलेक्ट्रीक कारच्या निर्मितीवेळी पेट्रोल, डिझेल कारच्या वापरापेक्षा जास्त प्रदूषण होत असल्याचे समोर आले आहे. ईव्ही वाहनांमध्ये लिथिअम आयनची बॅटरी वापरली जाते. तिच्या निर्मितीमध्ये प्रचंड प्रदूषण होते, असे समोर आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news