Homeअंतरराष्ट्रीयजगावर अणुयुद्धाचे संकट!

जगावर अणुयुद्धाचे संकट!

हुथी, हिजबुल्लाहच्या युद्धातील एन्ट्रीने धोका वाढला
इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईल हल्ला
तेहरान : वृत्तसंस्था
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्धा आता एक महिन्यानंतर अत्यंत भीषण वळणावर पोहोचले आहे. इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर झालेले हल्ले आणि इराणने दिलेले प्रत्युत्तर यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या युद्धात आता येमेनमधील हुथी बंडखोर आणि लेबनॉनमधील हिज्बुल्लाह या दोन्ही संघटनांनी उडी घेतल्याने मध्य-पूर्वेतील वातावरण तापले असून, आता अणुयुद्धाचा धोका वाढला आहे.

इराणमधील धार्मिक नेत्यांकडून आता अण्वस्त्रे बनविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. इराणने आधीच अण्वस्त्र निर्मितीसाठी आवश्यक युरेनियमच्या संवर्धनाची पातळी वाढविली आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलने इराणच्या यज्द येथील युरेनियम प्रोसेसिंग प्लांटवर हल्ला चढविला. या हल्ल्यामुळे संतप्त इराणने इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला. त्यातच येमेनच्या हुथी बंडखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याने अरब देशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तसेच हिज्बुल्लाहनेही कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याची घोषणा केली. त्यांनी अमेरिकेचे एफ-१८ लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे यातून भविष्यात अणुयुद्धाचा धोका वाढला आहे.

येमेनमधील इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी दक्षिण इस्रायलमधील बेअरशेबा शहर आणि आसपासच्या भागांना लक्ष्य करून २ हजार किमी अंतरावरून एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले. युद्धादरम्यान येमेनकडून इस्रायलवर झालेला हा पहिलाच हल्ला असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी गाझा युद्ध सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये हुथींनी इस्रायली जहाजे आणि नौदलाच्या नौकांवर हल्ले केले होते.

युद्ध भडकण्याचा धोका
येमेनमधून इस्रायलच्या दिशेने डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे सध्याचा संघर्ष वाढू शकतो. इस्रायली लष्कराने दावा केला आहे की, हुथी बंडखोरांनी येमेनमधून क्षेपणास्त्रे डागली आहेत. तथापि, येमेनच्या हुथी बंडखोरांनी अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. दरम्यान, जर हुथी उघडपणे या संघर्षात सामील झाले, तर हा संघर्ष संपूर्ण प्रदेशात पसरू शकतो. त्यांच्यात सागरी मार्गांमध्ये व्यत्यय आणण्याची क्षमता आहे. दरम्यान, हिजबुल्लाहनेही इस्रायली विमानांवर क्षेपणास्त्र डागले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR