जळकोट तालुक्याचा वीज प्रश्न सोडविण्याच्या सूचना

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील रावणकोळा व परिसरातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून वारंवार खंडित होणा-या वीजपुरवठ्यामुळे नागरिक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असताना या गंभीर समस्येची दखल घेत माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांची लातूर येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन स्थानिक शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.
वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेती, पाणीपुरवठा आणि दैनंदिन कामांवरही त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. याची गंभीर दखल घेत माजी मंत्री संजय बनसोडे यांनी महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.रावणकोळा व परिसरातील तांत्रिक बिघाड तातडीने दूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी महावितरण प्रशासनाला दिल्या. यावर मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी आवश्यक ती तातडीने कार्यवाही करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जळकोट नगरपंचायतीचे उपाध्यक्ष मन्मथ किडे, रावणकोळ्याचे सरपंच सत्यवान दळवे पाटील, अ‍ॅड. फिरोज पटेल, जयराज दळवे पाटील, उपसरपंच नभीभाई पटेल, माजी चेअरमन बळीराम दिंडे, माजी पोलिस पाटील गणपत दळवे पाटील यांच्यासह रावणकोळा व परिसरातील शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते. माजी मंत्री संजय बनसोडे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे रावणकोळा व परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news