शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर : प्रतिनिधी
आत्मा व कृषी महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हवामान बदल, एल-निनो परिस्थिती आणि हवामानानुसार शेती व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानी श्रीमती मनीषा बांगर होत्या. सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिगंबर पेरके व विस्तार विद्वेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सूर्यवंशी यांनी बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम व उपाययोजना स्पष्ट केल्या. कीटकशास्त्रज्ञ डॉ. दयानंद मोरे यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. डॉ. विजय भामरे यांनी मित्र कीटकांचे महत्त्व व जैविक नियंत्रणाविषयी माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र, मांजरा येथील डॉ. पी. एच. उलेमाले यांनी फलोत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान व बागायती पिकांचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी श्रीकृष्ण शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांनी हवामान-स्मार्ट व संशोधनाधारित शेतीचे अनुभव मांडले.
कार्यक्रमात शेतकरी, शास्त्रज्ञ व कृषी अधिका-यांमध्ये थेट संवाद झाला. शाश्वत शेती, पीक व्यवस्थापन, मृदा व पाणी व्यवस्थापन यावर सविस्तर चर्चा झाली. शेतक-यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविणे हा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी तिवडे यांनी केले. विजयकुमार गुडले आभार मानले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news