मांजरा सहकारी साखर कारखान्यास ‘बेस्ट शुगर फॅक्टरी अवॉर्ड’ प्रदान 

पुणे / लातूर : प्रतिनिधी
राज्यात व देशात साखर कारखानदारीत अव्वल स्थान मिळवणा-या देशात ऊस तोडणी १०० टक्के हार्वेस्टरद्वारे करणारा लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यास डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्टस असोसिएशनकडून देण्यात येणारा बेस्ट शुगर फॅक्टरी २०२६ अवॉर्ड  पुणे येथील शानदार सोहळ्यात शनिवारी राज्याचे माजी अर्थमंत्री, आमदार जयंत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा अवॉर्ड राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी तथा कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांच्यासह सन्माननीय संचालक मंडळाने स्वीकारला.
या शानदार पारितोषीक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहूणे म्हणून राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची उपस्थिती होती. तसेच द वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, कृष्णा साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले, द शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष संजय अवस्थी, द साउथ इंडियन अँड शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष आर. वी. कुंभार, सोहन शिरगावकर, एस. डी. बोखारे,  एम. के. पटेल, सी. जी. माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
मांजरा साखर कारखान्याचे एक पाऊल पुढे 
देशात, राज्यात सहकार क्षेत्रातील नावलौकिक असलेल्या लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून लोकनेते विलासराव देशमुख, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या साखर कारखान्याने गेल्या ४० वर्षात जे जे नवं ते ते हवं, या युक्तीप्रमाणे नवीन तंत्रज्ञान विकसित करून वेगळा ठसा उमटवला आहे.  मागच्या ३ वर्षापासून हार्वेस्टरद्वारे १०० टक्के ऊस तोडणी करणारा देशातील पहिला कारखाना ठरलेला असून आजतागायत कारखान्यास  तब्बल ६० पुरस्कार मिळालेले आहेत. त्यात राज्य शासन, व्हि. एस. आय. सह विविध देश राज्यस्तरीय पुरस्कार मिळवलेला हा पहिला कारखाना म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
कार्यक्रमास विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, संचालक कैलास पाटील, तात्यासाहेब देशमुख, वसंत उपाडे, सदाशिव कदम, अनिल  दरकसे, मदन भिसे, शंकरराव बोळंगे, नीळकंठ बचाटे, नवनाथ काळे, सचिन शिंदे, बाळासाहेब पांढरे, दयानंद बिडवे, विलास चामले, अरुण कापरे, भैरू कदम, सुरेश चव्हाण,  श्रीकृष्ण काळे, तानाजी जाधव, शत्रुघन पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई यांच्यासह खाते प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news