वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जागतिक फार्मा कंपनी एली लिली अँड कंपनीने मोठा झटका दिला. ही अमेरिकेतील मोठी कंपनी आहे. भारतासाठी या कंपनीने आनंदवार्ता दिली. ही कंपनी भारतात १अब्ज डॉलर म्हणजे जवळपास ८,८७९ कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक करेल. भारताच्या फार्मा सेक्टवर टॅरिफ लावणा-या ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकन कंपन्यांच बंडाळी करत असल्याचे मानले जात आहे. ही कंपनी भारतात औषधी निर्मिती आणि वितरण करणार आहे. अमेरिकेच्या इतरही काही कंपन्या भारताच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे.
भारतात एली लिली कंपनी १ अब्ज डॉलरची मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनीने याविषयीची अधिकृत घोषणा केली आहे. हैदराबाद येथे कंपनीचे नवीन कार्यालय होईल आणि येथेच कंपनीचे उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा आणि तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. आशिया आणि मध्य-पूर्वेत झटपट उत्पादन पोहचवण्यासाठी कंपनीने हे मोठे पाऊल टाकले आहे. भारताविरोधातील ट्रम्प यांच्या धोरणाला कंपनीने काडीचेही महत्त्व दिले नसल्याचे समोर येत आहे.
सध्या एल लिली कंपनीचे भारतात वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेहींसाठी औषधे बाजारात आली आहेत. मॉन्जारो हे औषध बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. जागतिक बाजारात पुरवठा साखळीवर कोणताही परिणाम होऊ नये आणि अमेरिकन सरकारच्या बदलेल्या धोरणांचा कोणताही परिणाम होऊ नये यासाठी कंपनीने भारतात सर्वात मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. हे ट्रम्प प्रशासनाविरोधातील मोठे बंड मानण्यात येत आहे.

