लातूर : प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड ता. लातूर यांच्या वतीने विभागीय प्रशिक्षण वरिष्ठ व निवड श्रेणी हे (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेले आहे. प्रशिक्षण २ ते १२ जून या कालावधीत होत आहे.
या प्रशिक्षणास दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे उत्साहात प्रारंभ झाला. हे प्रशिक्षण डायटचे प्राचार्य डॉ. मारुती सलगर व प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले असून, प्रशिक्षणाची सुरुवात नोडल अधिकारी ज्येष्ठ अधिव्याख्याता विजयकुमार सायगुंडे यांनी केली. गिरीश माने विषय सहाय्यक म्हणून उपस्थित होते. उद्घाटनास उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षणात डॉ. कैलास मोटे, थोटे बसवेश्वर, सुनील विठ्ठलराव तारे, स्वामी भीमाशंकर, सुगावे बालाजी, वैशाली चव्हाण, बाळू बुधे, दिप्ती कांगणे, गोविंद बरमदे आणि अनिल बिरादार हे मार्गदर्शन करीत आहेत. या प्रशिक्षणात लातूर, हिंगोली, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांतील शिक्षक सहभागी झाले आहेत.
















