हिमायतनगर : मौजे बोरगडी तांडा येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. यात पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुहेरी मृत्यूमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पायल विनोद राठोड वय २७ या एका लग्नसमारमासाठी माहेरी बोरगडी तांडा येथे आल्या होत्या. यानंतर दि. ११ मे रोजी रात्री त्यांचे पती विनोद रंगराव राठोड वय ३५ हे सासरी आले होते. यावेळी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि संतापाच्या भरात विनोद राठोड याने धारदार शस्त्राने पत्नी पायलचा गळा चिरून खून केला .
या घटनेनंतर तो फरार झाला मात्र दुस-या दिवशी दि. १२ मे रोजी विनोद राठोड याचा मृतदेह धानोरा शिवारात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमागील नेमके कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

