‘नीट ’प्रश्नपत्रिकेची पहिली कॉपी नाशिकमधून बाहेर पडल्याचा संशय

नाशिक : प्रतिनिधी
देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ठएएळ परीक्षा यंदा मोठ्या वादात सापडली आहे. 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

नाशिक पोलिसांनी या प्रकरणी सांगितले की, प्रस्तुत प्रकरणात आज दुपारी १२ च्या सुमारास एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. राजस्थान पोलिसांचे पथक येथे येणार आहे. ते येथे पोहोचल्यानंतर त्या तरुणाला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. संशयिताने आपले केस कापले होते. त्यामुळे त्याची ओळख पटवण्यात अडचण येत होती. पण तांत्रिक विश्लेषण व इतर गोष्टींच्या मदतीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दुसरीकडे, सूत्रांनी सदर आरोपी बीएएमएस चे शिक्षण घेत असल्याचा दावा केला आहे. तसेच त्याची मेडिकल काउन्सलिंग एजन्सी असल्याचीही माहिती मिळत आहे. यातील पेपर हे नाशिकमधूनच प्रिंट करण्यात आले होते, असाही संशय व्यक्त केला जात आहे.

नाशिक येथील प्रश्नपत्रिका हरियाणात पोहोचली
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, नाशिकमध्ये बाहेर पडलेली प्रश्नपत्रिका पुढे हरियाणात पोहोचवण्यात आली. हरियाणामध्ये त्या प्रश्नपत्रिकेचे दहा वेगवेगळे सेट तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर हे पेपर बिहार, आंध्र प्रदेश तसेच जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेल्या संस्था, एजन्सी आणि सुरक्षा यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पेपर लीक होण्याची साखळी इतक्या मोठ्या प्रमाणात कशी कार्यरत होती, याचा शोध आता केंद्रीय तपास यंत्रणा घेत आहेत. या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.

मनीष नावाचा संशयित जयपूरमधून अटक
तपासात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, जयपूरमधून अटक करण्यात आलेला मनीष नावाचा संशयित या संपूर्ण पेपरफुटीचा सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास अधिका-यांच्या मते, प्रश्नपत्रिका अधिकृतरीत्या छापली जाण्यापूर्वीच संभाव्य प्रश्नांची माहिती त्याने मिळवली होती. त्यानंतर संगनमताने प्रश्नपत्रिका बाहेर काढून ती विविध राज्यांमध्ये पोहोचवण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे. या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याचाही शोध सीबीआय घेत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यगृहाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर;अर्धवट नाट्यगृहाचे काम महिन्यांपासून ठप्प
04:14
Video thumbnail
शेकडो शेतकरी रस्त्यावर;महावितरणच्या अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्याने कासेगावचे आंदोलन तूर्तास मागे
00:37
Video thumbnail
Latur|MIDC मधील आग विझविण्यासाठी युद्धपातळीवरील प्रयत्न
04:07
Video thumbnail
Latur|साडेचार कोटींचे बसस्थानक तयार;तरी प्रवाशांना गळक्या शेडमध्येच थांबावे लागते!
01:22
Video thumbnail
Latur|वीज कोसळून बैल दगावला; शेतकरी दांपत्य स्वतःच ओढते नांगर#marathilivenews #maharashtranews
01:40
Video thumbnail
Latur|15 तास उलटले तरी आग विझेना; लातूर एमआयडीसीत अग्निशमन दलाची झुंज सुरू!
03:18
Video thumbnail
Nanded|नांदेड शहरातील प्री अक्षरा शाळेच्या गोडाऊनला आग;सुदैवाने जीवितहानी टळली
00:54
Video thumbnail
Latur Accident|दुचाकी स्लीप झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू; घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर
00:42
Video thumbnail
Latur Breaking|MIDC मधील नामांकित कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
02:07
Video thumbnail
Latur|लातूर एमआयडीसी मध्ये नामांकित कंपनीला भीषण आग; आगीत लाखोच साहित्य जळून खाक
00:15
Video thumbnail
बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'राऊंड'; रुग्णालयातील अनागोंदी कारभारावरून कर्मचाऱ्यांची काढली खरडपट्टी!
00:57
Video thumbnail
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा हाहाकार! जोरदार धक्क्यांनी इमारती हादरल्या; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
01:12
Video thumbnail
सासू झाली नवरी अन् जावई झाला नवरा! उत्तर प्रदेशातील 'या' अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
00:56
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26

Latest news