37.3 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeलातूरराज्य सिमेवरील चेकपोस्टवर पाच लाखांची रक्कम जप्त

राज्य सिमेवरील चेकपोस्टवर पाच लाखांची रक्कम जप्त

निलंगा  प्रतिनिधी
तालुक्यातील शहाजानी येथील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील पोस्ट चेकवर आज तपासणी करत असताना पाच लाख ५२ हजार  २०० रूपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.  यावेळी सपोनि विठ्ठल दुरपडे, गटविकास अधिकारी तथा आचारसंहिता प्रमुख सोपान अकेले चेक पोस्टचे पथक प्रमुख रघुनाथ तेलंग, ग्रामविकास अधिकारी एस. एस. गिरी, एस यू. खरात, वैभव ताटे, गोकुळ राठोड, पो. कॉ.  श्रीहरी डावरगावे, बळीराम केंद्रे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रमेश चाटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले आदी उपस्थित होते.
सदर रक्कम कर्नाटकातील बसवकल्याण एका टायर व्यापा-याची असल्याचे दिसून येते . याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले की सदर रक्कम ट्रेझरीकडे पाठविण्यात आली असून याबाबत जिल्हास्तरावरील समिती मार्फत सखोल चौकशी होणार असल्याचे एकमतशी बोलताना ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR