38.4 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeलातूररेणापूर तालुक्यात १ लाख १८ हजार मतदार

रेणापूर तालुक्यात १ लाख १८ हजार मतदार

रेणापूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आली असून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणुक विभागाच्या वतीने गावागावात जनजागृती करण्यात येत आहे. रेणापूर तालुक्यात एकुण ७८ गावे असून त्यात १ लाख १८ हजार २८० मतदारांची संख्या आहे. हे मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुक विभागाकडून मतदानासाठी १३६ मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या मतदान केंद्राबर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
५६ हजार १८४ महिला मतदार असुन पुरुष मतदारांची संख्या ६२ हजार ९६ अशी आहे. तालुक्यात १३६ मतदान केंद्र निश्चीत केले आहेत.तसेच १ हजार ४७० अपंग मतदारांची संख्या आहे. या मतदारांसाठी डिगोळ देशमुख येथे १ मतदान केंद्र असून तर १ युथ मतदार केंद्र स्थापन करण्यात आले आहे. रेणापूर येथील श्रीराम विद्यालयात १ सखी मतदान केंद्र निश्चीत करण्यात आले आहे . तालुक्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभागाने एक कार्यक्रम जाहीर केला आहे मतदान वाढविण्यासाठी सर्वच क्षेत्रातील नागरीकांना या प्रक्रियेत सहभागी करण्यात आले आहे.
मतदान  केंद्रामध्ये मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र अध्यक्ष, केंद्र संचालक, मतदान केंद्र अधिकारी राहणार आहेत.चिंचोलीराववाडी येथे बुथ मतदान केंद्र निश्चीत करण्यात आले आहे. यात तरुण कर्मचार्यांचा मोठा सहभाग राहणार आहे. अशी माहिती रेणापूर तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. तालुक्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाकडुन विविध उपक्रम राबविले जात आहेत. शंभर टक्के मतदान होण्यासाठी त्या त्या गावच्या नागरीकांनी पुढाकार घ्यावा मतदानापासून कोणिही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR