Homeअंतरराष्ट्रीयबॅँकॉकमध्ये रेल्वे अपघात; २२ प्रवासी ठार, ४० जखमी

बॅँकॉकमध्ये रेल्वे अपघात; २२ प्रवासी ठार, ४० जखमी

बॅँकॉक : थायलंडमध्ये बुधवारी मोठा रेल्वे अपघात झाला. या अपघातात २२ लोकांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बँकॉकपासून २३० किलोमीटर ईशान्येस असलेल्या नाखोन रत्चासिमा प्रांतात झाला. अधिका-यांनी सांगितले की, हाय-स्पीड रेल्वे पुलाच्या बांधकामात वापरली जाणारी क्रेन वेगाने धावणा-या पॅसेंजर ट्रेनवर पडली, ज्यामुळे ट्रेन रुळावरून घसरली आणि चालकाला ब्रेक लावण्याची संधी मिळाली नाही. रुळावरून घसरताच डब्यांना आग लागली.

अधिका-यांच्या मते, कोचमधील बहुतेक प्रवासी शाळेचे विद्यार्थी होते. या अपघातात ४० प्रवासी जखमी झाले आहेत, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. अनेक प्रवासी डब्यांमध्ये अडकले होते, ज्यांना कटिंग आणि स्प्रेडिंग उपकरणांच्या मदतीने बाहेर काढले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR