40.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रमहाजनसागराच्या साक्षीने श्रीमंत शाहू महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाजनसागराच्या साक्षीने श्रीमंत शाहू महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : ‘उरी होई धडधड छत्रपतीऽऽऽ’ या रोमारोमात स्फुल्­ंिलग चेतवणा-या टायटल साँगचा घुमणारा स्वर. ढोल-ताशांच्या निनादाला कैचाळाची लयबद्ध साथ हलगीच्या कडकडाटाची लहर कार्यकर्त्यांचा शाहू छत्रपती यांच्या जयजयकाराचा अखंड जयघोष महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी दिलेली भक्­कम एकजुटीची साक्ष आणि त्या साक्षीला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांच्या मोहोळाचे महाजनसागरात झालेले रूपांतर अशा सळसळत्या, उत्साहवर्धक वातावरणात लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने महाविकास आघाडीने प्रचंड शक्तिप्रदर्शन करत एकजूट दाखवून दिली. रणरणत्या उन्हाची तमा न करता जिल्ह्याच्या कानाकोप-यातून कार्यकर्ते दाखल झाले होते. त्यामुळे दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर अक्षरश: महाजनसागर लोटला होता.

फुलांनी सजवलेल्या वाहनात खास तयार करण्यात आलेल्या ओपन टफमध्ये श्री शाहू छत्रपती यांच्यासह महाविकास आघाडी घटक पक्षातील प्रमुख नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार श्रीमती जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, शरद पवार गट राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्या चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्­वास नारायण पाटील, शिवसेनेचे उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, दौलत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील, गडंिहग्लजच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी, राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभूळकर, माजी आमदार सुरेश साळोखे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे, माजी संचालक रामराजे कुपेकर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, आपचे संदीप देसाई, वंचित बहुजन आघाडीचे दयानंद कांबळे यांच्यासह विविध संस्था, संघटना व पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती या रॅलीमध्ये सहभागी होत्या. यामुळे कार्यकर्ते व नागरिकांच्या उत्साहात आणखी भर पडली. मिरवणूक मार्गावर ‘कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, जनतेचा निर्धार शाहू महाराज खासदार’ ही घोषणा दुमदुमली. इंडिया आघाडी व महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या २८ हून अधिक पक्षांच्या प्रमुखांचा, पदाधिर्का­यांचा व कार्यकर्त्यांचा या मिरवणुकीत सहभाग होता. यातून महाविकास आघाडीच्या एकजुटीचे दर्शन घडले. या प्रचंड शक्­तीप्रदर्शनाने कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून श्री शाहू छत्रपतींना दिल्­लीत पाठवण्याचा नारा अधिकच बुलंद झाला.

सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दसरा चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. मात्र तत्पूर्वी सकाळी नऊ वाजल्यापासूनच हजारो कार्यकर्ते दसरा चौकात गटागटाने दाखल होत होते. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे झेंडे हाती घेऊन आणि महाराजांच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्ते वाजत गाजत पोहोचले. दहा वाजता दसरा चौक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी फुलून गेला होता. धनगरी ढोल पथक, हलगीचा कडकडाट यामुळे वातावरण जल्­लोषी बनले. कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कागल, आजरा, गडंिहग्लज, चंदगड, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, गगनबावडा अशा प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सहभाग होता. कार्यकर्त्यांनी डोक्यावर पक्षाच्या टोप्या, गळ्यात मफलर तर कुणी फेटे परिधान केले होते. महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष, आरपीआय, भाकप, माकप, लाल बावटा, संभाजी ब्रिगेड, लोकजनशक्ती पार्टी अशा विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व शहरातील वेगवेगळ्या संस्था, तालीम संघटना, सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता. महिलांची उपस्थितीही मोठी होती. मिरवणूक मार्गावर पक्षाच्या विजयाच्या घोषणाच्या देत कार्यकर्त्यांनी तसेच महिला कार्यकर्त्यांनीही फेर धरला. फडफडणारे झेंडे, विजयाच्या घोषणा यामुळे मिरवणूक मार्गावर चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते.

रॅलीच्या अग्रभागी धनगरी ढोल व हलगी पथक होते. त्या पाठोपाठ कार्यकर्त्यांचा ताफा होता. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुखांचे, पदाधिका-यांचे प्रतिमा असलेले फलक घेऊन कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. कोल्हापूरच्या विकासासाठी-शाहू महाराजङ्घ जनतेसाठी कोल्हापूरचा एकच आवाज-शाहू महाराज.. कोल्हापूरची अस्मिता, कोल्हापूरचा स्वाभिमान-शाहू महाराज. जनतेचा निर्धार-शाहू महाराज खासदार’ या आशयाचे फलक लक्षवेधी ठरले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे ‘हिंदुत्वाची साद, उद्धवजींना साथ,’ या मजुकराचे फलकही लक्ष वेधून होते. ‘आमचं ठरलंय गद्दारांना मतदान नाही, चला गद्दारांना गाडायला, शाहू छत्रपतींचा फॉर्म भरायला’अशा मजकुराच्या फलकातून कार्यकर्त्यांनी फुटीर खासदारांना इशारा दिला.

मिरवणूक मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी श्री शाहू छत्रपतींचे स्वागत करण्यात येत होते. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून गेला होता. नागरिकांना अभिवादन करत रॅली दसरा चौक, व्हिनस कॉर्नर मार्गे पुढे मार्गस्थ झाली. हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागाने या मार्गावर जनसागर लोटल्यासारखी स्थिती होती. बसंत बहार रोड मार्गे रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. यावेळी कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा ‘शाहू छत्रपती की जय’ असा घोषणा केल्या. ‘कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज’ या घोषणांनी परिसर दुमदुमला. यानंतर शाहू महाराज छत्रपती हे महाविकास आघाडीच्या प्रमुख निवडक नेते मंडळीसोबत जाऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. शाहू छत्रपती यांनी ४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR