मूलभूत सुविधांसाठी नूतन नगरसेवकांकडून अपेक्षा

निलंगा : लक्ष्मण पाटील
निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्षांनी याकरिता कंबर कसली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने एकमत यूट्यूब चॅनलच्या वतीने नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. यावेळी नागरिकांनी सत्ताधा-यांनी केलेल्या विकासाचा आलेख सांगत त्यांनी विकासाकडे दुर्लक्ष केल्याचे सांगून विकास काय असतो हे आम्हाला नव वर्षांमध्ये पाहायलाच मिळाले नसल्याची खंत व्यक्त करीत नूतन नगरसेवकांकडे निदान मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी केली.

निलंगा पालिकेत सर्वाधिक काळ काँग्रेसची सत्ता होती. मात्र सन २०१६ साली नगरपालिकेवर जनतेनी मोठ्या अपेक्षने सन २०१६ साली भाजपाच्या ताब्यात एक हाती सत्ता दिली. पाच वर्षाच्या कालखंडात सत्ताधा-यांनी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांच्या कार्यकाळात शहरांमध्ये २४ तास पाणीपुरवठ्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे महत्वपूर्ण काम केले. याशिवाय प्रत्येक समाजासाठी सभागृह , ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिराच्या ठिकाणी भक्तांसाठी निवास, शहराचे सुशोभीकरण, शादी खाने व एमआयडीसीला जागा अपुरी पडत असल्याने नवीन जागा उपलब्ध करणे यामुळे शहराचा विकास झाला असल्याचे नागरिकांतून सांगण्यात आले. मात्र पाच वर्षाच्या भाजपाच्या सत्तेच्या कार्यकाळात व चार वर्षाच्या प्रशासक राजमध्ये विकास काय असतो हे आम्हाला पाहायलाच मिळाले नसल्याचा सत्ताधा-यावर आरोप करीत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

विशेष म्हणजे शहरांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यामध्ये पालिका अपयशी ठरल्याचा खंत व्यक्त करीत शहरात स्वच्छतेचे तीन तेरा उडाल्याचे नागरिकांनी सांगितले. एकीकडे शहराला पाणीपुरवठा होत असल्याचे सांगत असले तरी ते दोषित व पिवळसर पाणीपुरवठा होत असतानाही त्याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांना दूषित पाण्यावरच समाधान मानावे लागले. शहरातील काही प्रभागांमध्ये अजूनही रस्त्याचा पाण्याचा आणि स्वच्छतेचा प्रश्न मिटला नाही. मोकाट कुत्र्यासह जनावरावर आवर घालण्यामध्ये पालिका प्रशासन अपयशी ठरले. सत्ताधा-याकडून कोणताही ठराव नसताना अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे तीन ठिकाणी उद्घाटन करून समाजाची दिशाभूल करण्यात आली. शहरातील एमआयडीसी ओसाड पडली असून शहरात साधा एक सुईचाही कारखाना नसल्याचा नागरिकांनी सत्ताधा-यावर घाणाघाती आरोप केला. शहरातील सुजाण नागरिकांनी होतकरू चांगल्या विकास कामाची दृष्टी असलेल्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

शहराचे ग्रामदैवत असलेल्या निळकंठेश्वर मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्या ठिकाणी निगराणी करिता माणसाची नियुक्ती करण्यात यावी. निळकंठेश्वर मंदिर परिसरासह छत्रपती शिवाजी महाराज चौकात हॉटेलचालक घाण पाणी रस्त्यावर सोडत असल्याने रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शहरातील स्वच्छता , तुंबलेली गटार साफ करावेत, रस्त्याचा व पाण्याचा प्रश्न मिटवावा कारण निवडणुका आल्यानंतर एक दिसाड नळाला पाणी येते मात्र निवडणुका संपल्यानंतर आठवड्यातून एक दिवस नळाला पाणी येते, अशी दयनीय अवस्था शहरातील आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदार पळवापळवीचा आरोप!
07:46
Video thumbnail
Diwali 2026|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दीपोत्सव | हजारो दिव्यांनी उजळला हुजूर साहिब गुरुद्वारा
01:08
Video thumbnail
Diwali 2026|दैनिक एकमत कार्यालयात लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पूजा
06:02
Video thumbnail
Purna Fire News | पूर्णा येथे सायकल स्पेअरपार्ट दुकानाला भीषण आग | ३ लाखांचे नुकसान | एकमत डिजिटल
01:15
Video thumbnail
LIVE -एकमत कार्यालयातील दिवाळी लक्ष्मीपूजन सोहळा
00:00
Video thumbnail
Latur Diwali Firecracker Market | लक्ष्मीपूजनासाठी फटाका बाजारात गर्दी | शेतकऱ्यांना 20% सूट
03:31
Video thumbnail
Latur Diwali Shopping Rush | गंजगोलाई बाजारपेठेत तुफान गर्दी | वाहतूक कोंडी | एकमत डिजिटल
02:10

Latest news