रेणापूर : प्रतिनिधी
नगर पंचायत हद्दीतील विविध प्रलंबित विकासकामे तात्काळ सुरू करावीत, अन्यथा नगर पंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस पक्षाच्या नगरसेविक राजश्री संतोष शिंदे यांनी नगर पंचायत प्रशासनास दिला आला असून दि. १२ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या निवेदनाची अद्याप दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी निवेदनात करण्यात आला आहे.
रेणापूर शहरातील अनेक महत्त्वाची कामे गेल्या काही वर्षांपासून रखडलेली असून नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा अश्वारूढ पुतळा तात्काळ बसविण्यात यावा, मुस्लिम समाजासाठी दोन वेळा उद्घाटन झालेल्या शादीखान्याचे काम त्वरित सुरू करावे, तसेच शहरातील मोकाट डुकरांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, मुख्य बाजारपेठेतील झालेल्या कामाची चौकशी करून ते दुबार करण्यात यावे, चांदणी चौक परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने योग्य निचरा व्यवस्थेचे नियोजन करण्यात यावे
याशिवाय, रेणा नदीवरील मंजूर घाटाचे काम तात्काळ सुरू करावे, आठवडी बाजारातील गाठोडे टॅक्स नियमाप्रमाणे वसूल करून त्याच्या पावत्या देणे बंधनकारक करावे, नगर पंचायत हद्दीतील सर्व सार्वजनिक शौचालये दुरुस्त करून वापरात आणावीत, तसेच वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या व रहदारीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. अंगणवाडी क्रमांक १ ते ३ च्या नवीन इमारतींच्या बांधकामात शौचालयासाठी आवश्यक सेफ्टी टँक न बांधता टाक्या बसविण्यात येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून हे काम तात्काळ थांबवून नियमानुसार सेफ्टी टँक उभारावेत, अशी मागण्या मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत . दरम्यान, या सर्व मागण्यांबाबत नगर पंचायत प्रशासनाने दि. ६ जुलै २०२६ पर्यंत प्रत्यक्ष कामे सुरू करावीत, अन्यथा नगर पंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेविका राजश्री शिंदे यांनी दिला आहे .
















