Homeलातूरविलास को-ऑपरेटिव्ह बँकेचा २१०० वृक्ष लागवडीचा संकल्प

विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचा २१०० वृक्ष लागवडीचा संकल्प

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री,तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विलास को-ऑपरेटीव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विलास को-ऑपरेटीव्ह बँकेच्या वतीने २१०० वृक्ष लागवडी चा संकल्प केला आहे,
या वृक्ष लागवडीचा शुभारंभ शनिवार रोजी सायंकाळी ५ वाजता ६० फुटी रोड ते सिद्धेश्वर मंदिर रोड वरील शहीद अहमद खान चौक येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी मनपातील काँग्रेसचे गटनेते विजयकुमार साबदे, नगरसेवक सचिन बंडापल्ले, विकास कांबळे, युनिस मोमीन, माजी महापौर कैलास कांबळे, बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, उपाध्यक्ष अ‍ॅड. समद पटेल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सपाटे, संचालक अनिल शिंदे, सुर्यकांत कातळे, व्यंकटेश पुरी, विजय देशमुख, अरुण कामदार, अजय शहा, डॉ. कल्याण बरमदे, सलीम उस्ताद, प्रा. सौ. स्मिता खानापुरे, प्रा. सौ. जयदेवी कोळगे, चंद्रकांत धायगुडे, रमेश थोरमोटे, पंडित कावळे, सी. ए. ऋषिकेश पाटील, अभिषेक इगे, कर्मचारीवृंद व नागरिक आदींची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR