Homeअंतरराष्ट्रीययुद्धविराम फसला?

युद्धविराम फसला?

इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ले
तेहरान : वृत्तसंस्था
पाकिस्तानने इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेपुढे युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला, त्यावेळी इस्त्रायल लेबनॉनवर हल्ले करणार नाही, अशी एक अट ठेवण्यात आली होती. मात्र इस्त्रायलने पाकिस्तानची ही अट फेटाळून लावली. आमचा युद्धविराम हा फक्त इराणशी आहे. आम्ही लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवणार, असे इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटले होते आणि अवघ्या २४ तासांतच इस्त्रायलने लेबनॉनवर भीषण हल्ला केला. बॉम्बहल्ले सुरू केल्याने ८९ ठार आणि ७०० लोक जखमी झाले. दरम्यान, शस्त्रसंधी मोडित काढल्याने इराण भडकला आहे.

तत्पूर्वी इस्त्रायलने ५० फायटर जेटच्या मदतीने लेबनॉनवर भीषण हल्ला केला. यावेळी इस्त्रायलकडून तब्बल १६० बॉम्ब हल्ले करण्यात आले असून, हिज्बुल्लाहाच्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. इस्त्रायलच्या या हल्ल्यामध्ये १०० पेक्षा अधिक हिज्बुल्लाह संघटनेचे सदस्य मारले गेले. तसेच सामान्य नागरिकही मारले गेल्याची माहिती आहे. अनेक जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. हा हल्ला एवढा भीषण होता की, आता लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी या हल्ल्याविरोधात आपल्या मित्र राष्ट्रांची मदत मागितली आहे. दुसरीकडे या हल्ल्यावरून इराणने संताप व्यक्त केला असून, हे तर युद्धविरामाचे उल्लंघन असल्याचे सांगत होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा रोखण्याचा निर्णय घेतला. यामुळे जगभरातील ऊर्जासाधनांच्या पुरवठ्यावर पुन्हा परिणाम होऊ शकतो. इस्त्रायलने लेबनॉनमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यामुळे इराणने पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याने पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता आहे. इस्रायलही यात एक पाऊल मागे घ्यायला तयार नाही.

अन्यथा युद्धविराम तोडू
दुसरीकडे इराणनेही लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे, जर हल्ले थांबले नाहीत तर आम्ही युद्धविराम तोडू, अशी धमकी दिली. त्यामुळे आता हे युद्ध पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता आहे.

शस्त्रसंधीचा भंग, इराण
भडकला, सामुद्रधुनी बंद
शस्त्रसंधीमुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, इस्त्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने इराण भडकला असून, त्यांनी थेट होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे जगभरातील ऊर्जासाधनांच्या पुरवठ्यावर पुन्हा परिणाम होऊ शकतो. इस्त्रायलने लेबनॉनमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामुळे इराणच्या नौदलाने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR