मुंबई : विधान परिषदेसाठी भाजपच्या सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून भाजपने आपल्या यादीत माजी आमदार प्रमोद जठार, संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सुर्यकुमार शर्मा(अरविंद शर्मा), सुनिल विनायक कर्जतकर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधान परिषदेत जाण्यासाठी अनेक जण इच्छुक होते.
विद्यमान आमदारांपैकी एकाला संधी देण्यात आलेली नाही. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव यांना मात्र संधी देण्यात आली आहे. त्यांच्याच जागेवर होत असलेल्या पोटनिवडणूकीसाठी त्या आता भाजपच्या उमेदवार असतील. बाजी चार चेहरे हे नवीन आहेत. जुन्या चेह-यांना संधी मिळाली नाही. पुन्हा एकदा केशव उपाध्ये आणि माधव भांडारी यांच्या पदरी निराशा आली आहे.
यादी
सुनिल विनायक कर्जतकर,
माधवी नाईक,
संजय नथ्थूजी भेंडे,
विवेक विपिनदादा कोल्हे,
प्रमोद शांताराम जठार,
सुर्यकुमार शर्मा(अरविंद शर्मा),
डॉ. प्रज्ञा सातव.

