Homeपरभणीराष्ट्रीय शिक्षण रत्न, समाजरत्न, जीवन गौरव पुरस्कारासाठी आवेदन पत्र पाठविण्याचे आवाहन

राष्ट्रीय शिक्षण रत्न, समाजरत्न, जीवन गौरव पुरस्कारासाठी आवेदन पत्र पाठविण्याचे आवाहन

परभणी : एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्रच्या वतीने मागील २७ वर्षापासून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय शिक्षण रत्न, समाजरत्न, राष्ट्रीय एकता रत्न आणि जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. या पुरस्कारासाठी शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, कृषी, कला, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य, उद्योग, बचतगट आदी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या ५७ व्यक्तींना सिने कलावंतांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण दि.१० जून रोजी मराठी पत्रकार भवन, मनपा मार्ग, आझाद मैदान, मुंबई येथे दुपारी २.३० वाजता करण्यात आले आहे. या सोहळ्यात एकताचे प्रांत संघटक खा. रामराव वडकुते यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. विक्रम काळे असणार आहेत. पुरस्काराचे वितरण सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विशेष अतिथी सिने अभिनेते अली खान, अल्पसंख्याक आयोग माजी अध्यक्ष हाजी आरफात शेख, सिने अभिनेते अनिल मोरे यांची उपस्थिती राहणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याचे स्वागताध्यक्ष अरूण मराठे आहेत. स्वागत कार्याध्यक्ष सय्यद अली, पुरस्कार निवड समिती अध्यक्ष सुरेश हिवराळे आहेत. या पुरस्कार सोहळ्यासाठी दि.२५ मे पर्यंत विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींनी आवेदन पत्र पासपोर्ट फोटोसह एकता महिला प्रशिक्षण केंद्र, अली गार्डन जवळ, दर्गा रोड, परभणी या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन एकताचे संस्थापक अध्यक्ष तथा संयोजक अजमत खान यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR