शेतक-यांना पीक विमा न देता कंपनीने कमावले १०० कोटी 

लातूर : एजाज शेख
लातूर जिल्ह्यात एकुण ६० महसूल मंडळं आहेत. या सर्वच महसूली मंडळांत गतवर्षी अतिवृष्टीने शेतक-यांचे खुप मोठे नूकसान केले होते. खरीप हंगामात शेतक-यांच्या हाती काहींच लागले नाही. त्यामुळे किमान पीकविमा तरी मिळेल या आशेपोटी जिल्ह्यातील शेतक-यांनी पीकविमा भरला. आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीने लातूर जिल्ह्यातून ११८ कोटी रुपये पिकविम्याची रक्कम जमा केली. परंतु, पीकविमा ६० महसूल मंडळातील शेतक-यांना देण्याऐवजी केवळ ४ महसूल मंडळात १९ कोटी  रुपयांचा पीकविमा वाटला. ५६ महसूल मंडळातील अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना वा-यावर सोडून आयसीआयसी लोबार्ड कंपनीने शेतक-यांचेच १०० कोटी रुपये लुबाडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत.
लातूर जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार ७३९ एवढे खातेदार शेतकरी आहेत. ४ लाख ५४ हजार ४०० हेक्टर क्षेत्र होते. खरीप-२०२५ च्या पीक विम्यासाठी ७ लाख १२ हजार शेतक-यांनी आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीकडे प्रस्ताव दाखल केले होते. परंतू, या कंपनीने पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाचे वजन मीसमॅच झाले, रँडम नंबर योग्य वापरला नाही, प्लॉट चुकीचे निवडले, मळणी व्यवस्थित केली नाही, चुकीचे वजन घेतले, पीक कापणी प्रयोग झाले तिथे पीकच नव्हते, असे थातूरमातूर, बालीश आणि बोगस कारणे देत लातूर, धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप-२०२५ चा पीक विमा नाकारला आहे.
आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीने थातूरमातूर, बालीश आणि बोगस कारणे देत लातूर, धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप-२०२५ चा पीक विमा नाकारला आहे. त्यामुळे हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. राज्य सरकारने अशावेळी शेतक-यांच्या बाजुने खंबीरपणे उभे राहाण्याऐवजी शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. त्यामुळे शेतक-यांमधुन प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
एकीकडे शेतक-यांमधील असंतोष वाढत आहे. तर दुसरीकडे आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीचे अपील जिल्हा स्तरीय समिती आणि राज्य तांत्रिक समितीनेही फेटाळून लावले. त्यामुळे या कंपनीने काही तरी केल्याचे दाखवण्यासाठी लातूर जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांपैकी रेणापूर तालुक्यातील पानगाव आणि औसा तालुक्यातील भादा, बेलकुंड आणि जळकोट तालुक्यातील घोणसी या ४ महसूल मंडळातील शेतक-यांना विमा मंजूर केला. इतर महसूल मंडळातील पीक नुकसानीची दखलच घेण्यात आली नाही. याला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय आणि आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनी जबाबदार आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे
प्रचंड नूकसान होऊनही आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनी व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने लातूर जिल्ह्यातील ५६ महसूल मंडळातील शेतक-यांना पीकविमा नाकारला. खरे तर लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस स्वत: लातूर जिल्ह्यात पाहाणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना प्रति हेक्टरी १७ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. पीकविमा कंपनीने तर पीकविमा नाकारला आता किमान मुख्यमंत्र्यांनी तरी त्यांचे स्वत:चे आश्वासन पाळावे, शेतक-यांना नूकसान भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करुन, असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांनी दिला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'शेवटची उडी' ठरली काळ; पोहायला गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
01:38
Video thumbnail
सुरत-धुळे हायवेवर काळजाचा थरकाप: दोन एसटी बसची समोरासमोर धडक, ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
01:37
Video thumbnail
Latur|नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर लातुरात राष्ट्र सेवा दलाची गोलमेज परिषद
07:09
Video thumbnail
Latur|शिवरायांच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा 5-6 जूनला; रायगड सज्ज
03:56
Video thumbnail
Latur|क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; पिक विम्यावरून प्रशासनाला अल्टिमेटम
06:56
Video thumbnail
Latur|लातूर शहरात अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवर; फुटपाथ मोकळे करण्याची मोहीम वेगात
06:14
Video thumbnail
Nanded|शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मुदखेड तहसीलवर काँग्रेसचा आक्रोश मोर्चा
03:21
Video thumbnail
एका चाकावर जग जिंकले! केरळच्या तरुणाची नेपाळपर्यंतची साहसी 'युनिसिकल' सफर
00:37
Video thumbnail
पहाटेचा थरार! माल्टामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात शक्तिशाली स्फोट; अनेक किलोमीटरपर्यंत जाणवले धक्के
01:04
Video thumbnail
भाडेकरार मोडून शेतकऱ्यांची फसवणूक; 'टी.एस. विंड पॉवर' कंपनीच्या विरोधात तहसीलसमोर आमरण उपोषण
02:14
Video thumbnail
लातूर-बार्शी रोडवरील 'मोटेगावकर' यांचा कोट्यवधींचा प्लॉट चर्चेत; सीबीआयच्या रडारवर बेनामी मालमत्ता?
03:12
Video thumbnail
पीक विम्याचा घोळ: शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; जिल्हा कृषी अधीक्षकांना जमिनीवर बसवून केले आंदोलन
04:25
Video thumbnail
धाराशिव-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक: बसवराज पाटील आणि महेश देशमुख यांच्यात थेट लढत; अर्ज दाखल
02:06
Video thumbnail
अमर राजूरकर यांचा भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल; ३०० पार मतांचा विश्वास
06:35
Video thumbnail
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद लाइव्ह
16:58

Latest news