जिल्ह्यातील १४,५०० विद्यार्थ्यांची आज ‘नीट’ परीक्षा

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील २६ केंद्रांवर सुमारे १४ हजार ५०० विद्यार्थ्यांची आज दि. २१ जून रोजी ‘नीट’ परीक्षा होणार आहे. लातूर शहरात १९ तर उदगीर, निलंगा, अहमदपूर, चाकुर तालुक्यातील चापोली येथे ७ परीक्षा केंद्र असणार आहेत. ही परीक्षा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीआरपीएफ यांच्या निगराणीखाली होणार असून परीक्षेवर नियंत्रण एनटीएऐवजी पीएमओ ऑफिसचे राहणार असल्याने सर्व यंत्रणा डोळ्यात तेल घालून काम करीत आहे.
नीट परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रुमही स्थापन करण्यात आली आहे. नीट परीक्षा पार पडेपर्यंत कडक संरक्षण राहणार आहे. परीक्षा केंद्रावर प्रत्येक अधिकारी, कर्मचा-यांस ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे व लातूर येथील नीटच्या परीक्षेवर विशेष लक्षठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या परीक्षेसंबंधी कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले आहे. नीट परीक्षा केंद्र परिसरासह आतदेखील मोबाईल वापरास पूर्णत: बंदी केली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी स्वतंत्र बैठका घेऊन यंत्रणेला सूचना केलेल्या आहेत. येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात होणा-या नीट परीक्षेसाठी पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे.
या तयारी संदर्भात जिल्हा पोलिस प्रशासन व सीआरपीएफ यांचा समावेश आहे. या तयारीसाठी पोलिस प्रशासनातर्फे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, डीवायएसपी समिरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस इन्स्पेक्टर समाधान चवरे, पोलिस उपनिरीक्षक किशोर हांगे तसेच पोलिस अंमलदार साखरे, अविनाश शिंदे काम पाहत आहेत. यांच्यासोबत पीएसआय वाघमारे, सीआरपीएफ जवान शर्मा तसेच एस. एन. उदारे, एस. जी. कांबळे, एस. पी. सूर्यवंशी उपस्थित आहेत. या नीट परीक्षेसाठी महाविद्यालयातर्फे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, पर्यवेक्षक डॉ. हेमंत वरुडकर, प्रा. विजयकुमार मांदळे हे काम पाहत आहेत.या परीक्षेसाठी चोक बंदोबस्त करण्यात आलेला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Crime News|लातूरवर पोलिसांचे राज्य की कोयता गँगचे?;भरदिवसा महिला आणि चिमुकल्यावर हल्ला
01:50
Video thumbnail
Latur|NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांचे मॉक ड्रिल
02:15
Video thumbnail
BIG BREAKING : यशवाडी मारुती मंदिरात सभागृहाचा भाग कोसळला;40 ते 50 भाविक जखमी
01:18
Video thumbnail
Latur|14,500 विद्यार्थ्यांचे स्वप्न पणाला; उद्या NEET ची महासंग्राम परीक्षा!
02:27
Video thumbnail
Latur|NEET घोटाळ्यावर लातूर पेटलं! गांधी चौकात धरणे आंदोलन
06:21
Video thumbnail
Latur|औसा नगरपरिषदेवर अफसर शेख पुन्हा विराजमान
04:48
Video thumbnail
Nanded|पिस्तूल असती तर गोळ्या घातल्या असत्या!" ठाकरे गटाच्या नेत्याचा संताप
02:46
Video thumbnail
Ashok Chavan On Udhav Thakre|उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं!–अशोक चव्हाणांचा थेट टोला
02:30
Video thumbnail
Pandharpur|गोपाळपूरमध्ये गुटख्याचा सुळसुळाट; प्रशासन झोपेत?
00:57
Video thumbnail
Latur|एल निनोचा प्रभाव; लातूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर
00:34
Video thumbnail
NEET UG 2026| लातूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर;जिल्हाधिकारी स्वतः मैदानात
03:18
Video thumbnail
युक्रेनचा रशियावर मोठा प्रतिहल्ला; मॉस्कोमधील तेल शुद्धीकरण कारखान्यावर भीषण ड्रोन हल्ला
00:27
Video thumbnail
भंडारदऱ्यात निसर्गाची जादू! लाखो काजव्यांच्या प्रकाशाने उजळले गर्द जंगल
00:27
Video thumbnail
अक्षय कुमारने घेतले माता वैष्णोदेवीचे दर्शन; जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे लावली हजेरी
01:09
Video thumbnail
Latur|फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान
03:47

Latest news