एस. टी. महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना मिळणार ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड

लातूर : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळातर्फे विविध सामाजिक घटकांना प्रवास भाड्यात देण्यात येणा-या सवलतींसाठी आता आधारकार्ड संलग्न ‘एनसीएमसी अनेब्ल्ड स्मार्ट कार्ड’ वितरीत करण्यात येत आहे. लवकरच शालेय व व्यावसायिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या पासेसकरिताही या कार्डची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
शासनाच्या ९ ऑक्टोबर २०१८ च्या निर्णयानुसार सवलतधारी प्रवाशांना स्मार्ट कार्ड देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळ, मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्ड देण्याची कार्यवाही सर्व आगारांमध्ये सुरू आहे. १६ फेब्रुवारी २०२६ पासून अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारी प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, याच धर्तीवर आता नजीकच्या काळात विद्यार्थ्यांनाही हे स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे.
शालेय, शैक्षणिक, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना आता ‘सरल’ व ‘अपार’ क्रमांक संलग्न एनसीएमसी कार्ड प्राप्त होणार आहे.  यासाठी हे दोन्ही क्रमांक विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. शालेय विद्यार्थ्यांना मासिक पासाकरिता लागणा-या या स्मार्ट कार्डचा मागणी अर्ज एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अर्जात नमूद केलेली माहिती व जोडलेली आवश्यक कागदपत्रे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक असून, त्यानंतरच हा अर्ज आगारातील किंवा बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रक अथवा अधिकृत एजंट यांच्याकडे जमा करावयाचा आहे. या कार्डच्या नोंदणी प्रक्रियेसाठी विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांचा चालू मोबाईल (भ्रमणध्वनी) क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अर्जाची तपासणी व पडताळणी झाल्यानंतर आवश्यक शुल्क आकारून विद्यार्थ्यांना पावती दिली जाईल. नोंदणी पूर्ण झालेले हे एनसीएमसी कार्ड ३० दिवसांच्या आत प्रिंट करून संबंधित आगारास प्राप्त होईल आणि त्यानंतर आगारामध्ये पॉस (पीओएस) मशिनद्वारे हे कार्ड अ‍ॅक्टिव्ह करून ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना वितरित केले जाईल. तरी सर्व संबंधित विद्यार्थी आणि पालकांनी नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची आगाऊ पूर्तता करून ठेवावी, असे आवाहन लातूर राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभाग नियंत्रकांनी केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Crime News|लातूरवर पोलिसांचे राज्य की कोयता गँगचे?;भरदिवसा महिला आणि चिमुकल्यावर हल्ला
01:50
Video thumbnail
Latur|NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांचे मॉक ड्रिल
02:15
Video thumbnail
BIG BREAKING : यशवाडी मारुती मंदिरात सभागृहाचा भाग कोसळला;40 ते 50 भाविक जखमी
01:18
Video thumbnail
Latur|14,500 विद्यार्थ्यांचे स्वप्न पणाला; उद्या NEET ची महासंग्राम परीक्षा!
02:27
Video thumbnail
Latur|NEET घोटाळ्यावर लातूर पेटलं! गांधी चौकात धरणे आंदोलन
06:21
Video thumbnail
Latur|औसा नगरपरिषदेवर अफसर शेख पुन्हा विराजमान
04:48
Video thumbnail
Nanded|पिस्तूल असती तर गोळ्या घातल्या असत्या!" ठाकरे गटाच्या नेत्याचा संताप
02:46
Video thumbnail
Ashok Chavan On Udhav Thakre|उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं!–अशोक चव्हाणांचा थेट टोला
02:30
Video thumbnail
Pandharpur|गोपाळपूरमध्ये गुटख्याचा सुळसुळाट; प्रशासन झोपेत?
00:57
Video thumbnail
Latur|एल निनोचा प्रभाव; लातूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर
00:34
Video thumbnail
NEET UG 2026| लातूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर;जिल्हाधिकारी स्वतः मैदानात
03:18
Video thumbnail
युक्रेनचा रशियावर मोठा प्रतिहल्ला; मॉस्कोमधील तेल शुद्धीकरण कारखान्यावर भीषण ड्रोन हल्ला
00:27
Video thumbnail
भंडारदऱ्यात निसर्गाची जादू! लाखो काजव्यांच्या प्रकाशाने उजळले गर्द जंगल
00:27
Video thumbnail
अक्षय कुमारने घेतले माता वैष्णोदेवीचे दर्शन; जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे लावली हजेरी
01:09
Video thumbnail
Latur|फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान
03:47

Latest news