मुंबई, कोकणात धो-धो पाऊस

मुंबईत जनजीवन विस्कळीत, कोकणात नद्यांना पूर
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील ब-याच भागांत गेल्या ३ दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून मुंबईतही धो-धो पाऊस कोसळत आहे. याशिवाय पुण्यासह कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ४ ते ६ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. मुंबई, कोकणसह या ५ जिल्ह्यातील नागरिकांनी रेट अलर्टच्या या काळात सतर्क राहावे. विशेषत: सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.

कल्याण-डोंबिवली, पालघर जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून उद्या जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुटी जाहीर करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात उद्या पावसाचा जोर वाढणार असून अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असे जिल्हा प्रशासनाचे आवाहन आहे.

कोकणातही मुसळधार
कोकणातही मुसळधार पाऊस कोसळत असून, सर्वत्र, नद्या, नाले तुडुंब भरून वाहात आहेत. त्यातच वाशिष्टी नदीला पूर आला आहे. त्यामुळे वाशिष्टी नदीसह इतर नद्या, नाल्यांनाही पूर आला असून, नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला.

केडीएमसीमध्ये
शाळांना सुटी जाहीर
ठाणे जिल्ह्यात आजपर्यंत कालावधीत ऑरेज होता आता ४ आणि ५ जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका आहे. त्यासाठी ४ जुलै रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली.

पुढील ४ दिवसात
राज्यात मुसळधार
राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे तर काही भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. मुंबईसह कोकणात आणि विदर्भातील काही भागात चांगला पाऊस कोसळत आहे. आता ३ ते ७ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

मराठवाड्यात प्रतीक्षाच
मुंबई, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून, प्रकल्पही भरत आहेत. मात्र, मराठवाड्याच्या नशिबी अद्याप प्रतीक्षाच आहे. तुरळक ठिकाणीच रिमझिम सरी कोसळत असल्याने शेतकरी धास्तावला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:24:02
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
22:03
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
00:00
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
36:07
Video thumbnail
Latur|लातूरवर पाणीसंकटाचे सावट; १३५ गावांचा पर्यायी पाणीपुरवठ्यावर आधार
03:21
Video thumbnail
Latur|घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन
01:02
Video thumbnail
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे भीषण अपघात: एलपीजी टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू
01:51
Video thumbnail
Latur|स्मार्ट वीज मीटरवरून मनसे आक्रमक; किल्लारीत जोरदार आंदोलन!
04:33
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; जेसीबीची धडक कारवाई
04:10
Video thumbnail
Latur| अखेर शेतकऱ्याला परत मिळाली बैलजोडी!
04:27
Video thumbnail
शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्फोटक पत्रकार परिषद लाईव्ह
08:29
Video thumbnail
लातूर-उदगीर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; कार, ऑटो आणि दुचाकीच्या धडकेत तिघे गंभीर जखमी
00:53
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
04:50:10
Video thumbnail
Latur Traffic Issue|रस्ते बंद करूनही कोंडी कायम? लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर
03:00

Latest news